Home /News /national /

Rajya Sabha Election: 4 राज्ये, 16 जागा; आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान

Rajya Sabha Election: 4 राज्ये, 16 जागा; आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान

Rajya Sabha Election Voting: राज्यसभा निवडणुकीत क्रिकेटसारखा थरार पाहायला मिळणार आहे कारण सर्वच राजकीय पक्ष एक एक मतासाठी प्रयत्नशील असणार आहेत.

    नवी दिल्ली, 10 जून: 10 जून रोजी म्हणजेच देशातील चार राज्यांतील 16 राज्यसभेच्या (Rajya Sabha) जागांसाठी मतदान होणार आहे. राजस्थान (Rajasthan), कर्नाटक (Karnataka), हरियाणा (Haryana) आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) राज्यसभेच्या 16 जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. विविध पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये (MLAs in hotels And Resorts) ठेवले आहे, तर निवडणूक आयोगाने विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे आणि संपूर्ण मतदानाची व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळच्या राज्यसभा निवडणुकीत क्रिकेटसारखा थरार पाहायला मिळणार आहे कारण सर्वच राजकीय पक्ष एक एक मतासाठी प्रयत्नशील असणार आहेत. सर्वच पक्षांसमोर आपल्या आमदाराची मतं टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. या चारही राज्यांमध्ये पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेल किंवा इतर कोणत्याही सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था केली होती. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आणि पियूष गोयल (Piyush Goyal), काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala), जयराम रमेश (Jairam Ramesh)आणि मुकुल वासनिक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. या सर्व नेत्यांनी कोणत्याही अडथळ्याविना विजयी होणे अपेक्षित आहे. नुकत्याच द्विवार्षिक निवडणुका जाहीर राज्यसभेच्या 57 जागांसाठी नुकत्याच द्विवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आणि उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, पंजाब, तेलंगणा, झारखंड आणि उत्तराखंडमधील सर्व 41 उमेदवार गेल्या शुक्रवारी बिनविरोध निवडून आले. मात्र, शुक्रवारी हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 16 जागांसाठी निवडणूक होणार आहे, कारण उमेदवारांची संख्या लढवायची असलेल्या जागांपेक्षा जास्त आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भाजप आणि काँग्रेसने आपल्या आमदारांना प्रतिस्पर्धी पक्षांनी आपल्या बाजूने आणू नये म्हणून घोडेबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये ठेवलं होतं. महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक होणार असल्याने सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान होणार असून, गुरुवारी विविध राजकीय पक्ष आपली रणनीती आखण्यात व्यस्त होते.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Haryana, Karnataka, Maharashtra News, Rajasthan, Rajyasabha

    पुढील बातम्या