Home /News /national /

राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला भगदाड, भाजपची ताकद वाढणार?

राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला भगदाड, भाजपची ताकद वाढणार?

गुजरातमध्ये राज्यसभेतील एका जागेसाठी किमान 38 मतांची आवश्यकता असते. अशा स्थितीत आता दोन जागा थेट भाजपच्या गोटात जाणार असल्याचं दिसत आहे.

    नवी दिल्ली, 04 जून : राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेस पक्षाला भगदाड पडायला सुरुवात झाली आहे. गुजरातमधील काँग्रेसचा 7 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आज पुन्हा दोन आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. या दोन आमदारांचा संपर्क होत नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. दे दोन्ही आमदार सध्या पक्षातील कोणत्याच व्यक्तीसोबत बोलण्यासाठी तयार नसल्याच्या चर्चा कानावर येत आहेत. अशाप्रकार काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामे देणं हे भाजपच्या हिताचं ठरू शकतं. गुजरात विधानसभेमध्ये भाजपकडे 103 आमदार आहेत. एनसीपी आणि बीटीपीच्या दोन आमदारांचं समर्थन आहे. काँग्रेसकडे केवळ 73 आमदार होते त्यापैकी 7 आमदारांनी राजीनामा दिला आता पुन्हा दोन आमदार राजीनाम्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. सध्या गुजरात विधानसभेत काँग्रेसचे 66 आमदार आहेत. गुजरातमध्ये राज्यसभेतील एका जागेसाठी किमान 38 मतांची आवश्यकता असते. अशा स्थितीत आता दोन जागा थेट भाजपच्या गोटात जाणार असल्याचं दिसत आहे. या दोन्ही जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला 76 मतांची आवश्यकता आहे. मात्र त्यांच्याकडील संख्याबळ केवळ 66 आहे. याच संधीचा फायदा भाजप घेऊ शकतं. राज्यसभेच्या दोन्ही जागा मिळवणं काँग्रेससमोर मोठं आव्हान आहे. काँग्रेसचे माजी नेते नरहरी अमीन यांना काँग्रेसनं तिसरी उमेदवारी दिली आहे. शक्तीसिंग गोहिल आणि भरतसिंग सोलंकी हे राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भाजपने अभय भारद्वाज आणि रामिवा बेन बारा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गुजरातमधील दोन्ही जागा कोणाच्या गोटात जाणार भाजप या संधीचा कसा फायदा घेणार हे पाहाणंही महत्त्वाचं ठरणार आहे. संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या