आधी दिला चहा, आता करणार उपवास ; उपसभापतींच्या भूमिकेनं नवा ट्विवस्ट

आधी दिला चहा, आता करणार उपवास ; उपसभापतींच्या भूमिकेनं नवा ट्विवस्ट

हरिवंश सिंह यांनी खासदारांना चहा आणून दिल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करून सिंह यांचे कौतुक केले होते

  • Share this:

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : राज्यसभेत गोंधळ घातल्या प्रकरणी राज्यसभेच्या 8 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. पण, या प्रकरणावरून उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी आता नवीनच भूमिका मांडली आहे. या 8 खासदारांच्या वर्तवणुकीमुळे हरिवंश सिंह एक दिवसांचा उपवास करणार आहे.

कृषी विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित सर्व सत्रांसाठी सोमवारी निलंबित करण्यात आले. दोन दिवसांमधील राज्यसभेत घडलेल्या घडामोडींमुळे व्यथित होऊन राज्यसभेचे उपसाभपती हरिवंश सिंह यांनी एकदिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

क्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल

'भगवान बुद्ध माझ्या जीवनाचे प्रेरणा स्त्रोत आहे. बिहारची जमीन ही आत्‍मज्ञान मिळवणारी आहे. त्यामुळे राज्यसभेत जो गोंधळ घडला होता, त्यामुळे मी व्यथित झालो आहे. माझ्यासोबत अपमानजनक व्यवहार झाला.  त्यामुळे एक दिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या या उपोषणामुळे आंदोलक खासदारांमध्ये आत्मशुद्धीची भावना जागृत होईल', असं हरिवंश सिंह यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे, निलंबित खासदारांनी सोमवारपासून  गांधीगिरी करत रात्रभर संसद भवनात ठिय्या मांडला. त्यांच्या या गांधीगिरीला उत्तर देत खुद्द उपसभापती  हरिवंश नारायण सिंह यांनी सकाळी चहा आणला होता.

हरिवंश सिंह यांनी चहा आणल्यामुळे काँग्रेस खासदार रिपून बोरा यांनी आश्चर्य व्यक्त करत प्रतिक्रिया दिली. हरिवंश यांनी आमच्यासाठी चहा आणून ते आमच्यासोबत एका सहकाऱ्याप्रमाणेच वागले आहे. त्यामुळेच आता संसदेत यावर चर्चा करून आमचे निलंबन मागे घ्यावे, असं रिपून बोरा म्हणाले.

देशात रुग्ण बरे होण्याची आकडेवारी दिलासादायक, पाहा 24 तासांतील लेटेस्ट अपडेट

हरिवंश सिंह यांनी खासदारांना चहा आणून दिल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करून सिंह यांचे कौतुक केले होते. हरिवंश सिंह बिहारचे  आहे. बिहारकडून हे शिकण्यासारखे आहे, असं ट्वीट मोदींनी केले होते.

राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी  उपसभापती  हरिवंश नारायण सिंह यांच्यासमोर असलेला माइक तोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सभापती व्यंकय्या नायडू यांनी  8 ही खासदारांना सात दिवसांसाठी निलंबित केले.

संसदेच्या परिसरात राज्यसभा सदस्य राजीव  सातव यांच्यासह काँग्रेसचे तीन, डाव्या पक्षाचे दोन, तृणमूल काँग्रेसचे दोन आणि आम आदमी पक्षाचे एक खासदार रात्रभर अशा आठ खासदारांनी संसद परिसरात ठिय्या मांडला. यात  डेरेक ओब्रायन, दोला सेन (तृणमूल), राजीव सातव, रिपून बोरा, सईद नासीर हुसेन (काँग्रेस), संजय सिंह (आप), के.के. रागेश, इल्लामारम करीम (CPI-M) यांचा समावेश आहे.

Published by: sachin Salve
First published: September 22, 2020, 11:22 AM IST
Tags:

ताज्या बातम्या