पहिल्यांदाच एक ऑलिंपिकपटू झाला क्रीडा मंत्री

पहिल्यांदाच एक ऑलिंपिकपटू झाला क्रीडा मंत्री

या आधी विजय गोयल क्रीडा मंत्री होते. आता राजवर्धन क्रीडा मंत्र्यासोबत सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या राज्यमंत्र्याचा पदभारही सांभाळणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली,03 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रालयाचा आज विस्तार करण्यात आला. 4 कॅबिनेट आणि 9 राज्यंत्र्यांनी शपथ घेतली. याशिवाय काही मंत्र्यांना प्रमोशनही देण्यात आलं. यातच राजवर्धन राठोड यांना क्रीडा मंत्री करण्यात आलं. राठोड यांना ऑलिंपिकमध्ये रौप्य मेडलही मिळालं आहे.

या आधी विजय गोयल क्रीडा मंत्री होते. आता राजवर्धन क्रीडा मंत्र्यासोबत सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या राज्यमंत्र्याचा पदभारही सांभाळणार आहेत. राजवर्धन यांना 2004 साली झालेल्या अॅथेन्स ऑलिंपिकमध्ये शूटिंगमध्ये हे रौप्यपदक मिळालं होतं. त्यानंतर त्यांना अर्जून पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. भारतात पहिल्यांदाच एक ऑलिंपिकपटू क्रीडा मंत्री होत असल्याने क्रीडाविश्वात आनंदाचं वातावरण आहे. राजवर्धन राठोड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. विशेष म्हणजे ऑलिंपिककमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या अभिनव बिंद्रानेही त्यांचंअभिनंदन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2017 05:11 PM IST

ताज्या बातम्या