राजू शेट्टींना मध्य प्रदेशात अटक

राजू शेट्टींना मध्य प्रदेशात अटक

शेतकरी यात्रेदरम्यान मंदसौरमधील पिंपलमडिया गावातून शहीद शेतकऱ्यांचे अस्थिलकश नेताना पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांच्यावर कारवाई केलीय.

  • Share this:

06 जुलै : खासदार राजू शेट्टींना मध्य प्रदेशातील मंदसौर इथं पोलिसांनी अटक केलीय. शेतकरी यात्रेदरम्यान मंदसौरमधील पिंपलमडिया गावातून शहीद शेतकऱ्यांचे अस्थिलकश नेताना पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांच्यावर कारवाई केलीय. यावेळी शेट्टी यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

मंदसौर हल्ल्यातील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांचे अस्थिकलश राजू शेट्टी दिल्लीतील जंतर मंतरला घेऊन जाणार होते. मात्र हे आंदोलन सुरू होताच पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना अटक केलीय.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवरील किसान मुक्ती यात्राला मध्यप्रदेशातल्या बुढामधून सुरुवात झाली.या मोर्चात राजू शेट्टींसह सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, योगेंद्र यादव यांच्यासह 25 राज्यातले शेतकरी सहभागी झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 01:53 PM IST

ताज्या बातम्या