राजू शेट्टींचा 'स्वाभिमानी' काँग्रेससोबत,यूपीएमध्ये सहभागी

आज राजू शेट्टी यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी अशोक चव्हाण हेही उपस्थितीत हो

Sachin Salve | Updated On: Mar 19, 2018 05:48 PM IST

राजू शेट्टींचा 'स्वाभिमानी' काँग्रेससोबत,यूपीएमध्ये सहभागी

19 मार्च : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यूपीएमध्ये सहभागी झाले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत राजू शेट्टींची बैठक झालीये. या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी यूपीएमध्ये सहभागाची घोषणा केली.

चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एनडीएला सोडचिठ्ठी दिलाय. आज राजू शेट्टी यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी अशोक चव्हाण हेही उपस्थितीत होते. राहुल गांधी यांच्यासोबत तिन्ही नेत्यांची बैठक पार पडली.

या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी राजू शेट्टी यूपीएमध्ये सहभागी झाले आहे अशी माहिती दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी  आम्ही यूपीएमध्ये सहभागी झालोय असं म्हणत राजू शेट्टी यांनी यूपीए सहभागाची घोषणा केली.

2019ची निवडणुक युपीएचा घटकपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणाही राजू शेट्टी यांनी केली. विशेष म्हणजे भाजपच्या धोरणांवर आगपाखड करणाऱ्या राजू शेट्टींनी याआधीच एनडीएला सोडचिठ्ठी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2018 05:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close