पाकिस्तानमधून ती भारतात शिक्षणासाठी आली आणि नागरिकत्व मिळाल्यानंतर 4 महिन्यातच झाली सरपंच

पाकिस्तानमधून ती भारतात शिक्षणासाठी आली आणि नागरिकत्व मिळाल्यानंतर 4 महिन्यातच झाली सरपंच

मूळची पाकिस्तानची असलेल्या आणि भारतीय नागरिकत्व स्वीकारलेल्या नीता कंवर आता टोंक जिल्ह्यातील नटवाडा ग्रामंपचायतीची सरपंच होणार आहे.

  • Share this:

जोधपूर, 18 जानेवारी : मूळची पाकिस्तानची असलेल्या आणि भारतीय नागरिकत्व स्वीकारलेल्या नीता कंवर आता टोंक जिल्ह्यातील नटवाडा ग्रामंपचायतीची सरपंच होणार आहे. तिने 362 मतांनी विजय मिळवला आहे. पाकिस्तानची असलेल्या नीता कंवर तिच्या चुलत्यांकडे पाकिस्तानातून भारतात शिक्षण पूर्ण करण्यासाठी 2001मध्ये  आली होती. 2011 मध्ये तिचा विवाह टोंकमध्ये झाला होता.

राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील एका गावाची सरपंच म्हणून नीता कंवरची निवड झाली आहे. मूळची पाकिस्तानची असलेल्या नीताला सप्टेंबर 2019 मध्ये 8 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताचे नागरिकत्व मिळालो हेते. त्यानंतर चारच महिन्यात तिला नटवाडाची सरपंच होण्याचा मान तिला मिळाला.

गावच्या सरपंचपदासाठी नीताला निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय तिच्या सासऱ्यांनी घेतला होता. गावाच्या विकासाला प्राधान्य देण्याचं आश्वासन नीताने दिलं आहे. पाकिस्तानमध्ये जन्म, भारतात शिक्षण आणि लग्न झाल्यानंतर नागरिकत्व मिळाल्यानंतर राजकारणात नवीन सुरुवात करण्याची संधी लोकांनी दिल्याचं नीता म्हणाली.

निर्भयाच्या दोषींना माफ करा, सोनिया गांधींचे उदाहरण देत वकिलांची मागणी

नीता कंवर 18 वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात आली. शिक्षण पुर्ण करण्यासाठी ती 2001 मध्ये तिचे चुलते नखत सिंग सोढा यांच्याकडे आली होती. 2005 मध्ये तिने सोफिया कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर 2011 मध्ये नटावाडा राज घराण्यातील ठाकुर लक्षण करण राठोड यांच्या मुलाशी तिचा विवाह झाला. त्यानंतर 8 वर्षांनी तिला भारताचे नागरिकत्व मिळाले. नीताचे सासरे याआधी तीनवेळा नटवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्यांनीच नीताला निवडणूक लढवण्याची प्रेरणा दिली.

'महात्मा गांधींना भारतरत्न नाही', सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

First published: January 18, 2020, 1:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading