मराठी बातम्या /बातम्या /देश /

हद्द झाली राव! हाय कोर्टासमोर वकील बनियानवर सुनावणीला हजर, न्यायाधीशांनी फटकारले

हद्द झाली राव! हाय कोर्टासमोर वकील बनियानवर सुनावणीला हजर, न्यायाधीशांनी फटकारले

पतीने पाठवलेल्या नोटीसीत म्हटले आहे की – नोटीस मिळाल्यानंतर पुढील 2 आठवड्यांनतर तर मानहानीचा निधी दिला नाही तर कायदेशीर कारवाईन केली जाईल. त्यात पतीने म्हटले आहे की – मला कळालं आहे की तुमचं माझ्या पत्नीसोबत शारिरीक संबंध आहेत.

पतीने पाठवलेल्या नोटीसीत म्हटले आहे की – नोटीस मिळाल्यानंतर पुढील 2 आठवड्यांनतर तर मानहानीचा निधी दिला नाही तर कायदेशीर कारवाईन केली जाईल. त्यात पतीने म्हटले आहे की – मला कळालं आहे की तुमचं माझ्या पत्नीसोबत शारिरीक संबंध आहेत.

उच्च न्यायालयाने घेतलेल्या ऑनलाइन सुनावणीवेळी एक वकील चक्क बनियनवर हजर झाल्यानं न्यायाधीशांनी त्याला नोटीस पाठवली.

  • Published by:  Suraj Yadav
जयपूर, 26 एप्रिल : न्यायालयात वकील म्हटलं की काळ्या कोटातली व्यक्ती हातात फाईल असं काहीस चित्र दिसतं. मात्र राजस्थानातील हायकोर्टात एक वकील चक्क न्यायाधीशांसमोर बनियान घालून आला. एका प्रकरणाची ऑनलाइन सुनावणी असताना हा प्रकार घडला. लॉकडाऊनमुळे न्यायलय ऑनलाइन सुनावणी घेत आहे. अशाच एका प्रकरणी जामीन याचिकेवर सुनावणी सुरू होती. तेव्हा हजर झालेल्या एका वकिलामुळे न्यायाधीश संतापले. राजस्थान उच्च  न्यायालयाच्या जयपूर पीठाचे न्यायमूर्ती संजीव प्रकाश वर्मा यांनी शुक्रवारी ऑनलाइन सुनावणी घेतली. यावेळी त्यांनी योग्य कपड्यात हजर न झालेल्या वकिलांना फटकारलं. वकील रविंद्र कुमार पालीवाल हे आरोपी लालराम गुर्जर याची बाजू मांडत होते. जामिनाची याचिकेवरची ही सुनावणी 5 मेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राजस्थान उच्च न्यायलयाने  या काळात ऑनलाइन सुनावणी घेतली आहे. यात एका सुनावणीवेळी वकील योग्य पोषाखात हजर झाले नाहीत. तेव्हा न्यायाधीशांनी संबंधित वकीलांना नोटिस पाठवली आहे. हे वाचा : कोरोना शेल्टरमध्ये पडले प्रेमात, 30 दिवसात झालं शुभमंगल सावधान न्यायालयाने वकीलाच्या अशा वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली. तसंच आरोपीच्या प्रकऱणाची सुनावणीही पुढे ढकलली. वकील रविंद्र कुमार यांना उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली असून पुढच्या सुनावणीला नीट उपस्थित रहा असं सांगितलं आहे. हे वाचा : ज्यांना बाहेर जायचंय, त्यांनी खुशाल जा! पोलिसांची पुणेकरांसाठी एक खुली ऑफर संपादन - सूरज यादव
First published:

पुढील बातम्या