राजस्थानमध्ये 'लव्ह जिहाद'च्या संशयावरून एकाची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळला

'लव्ह जिहाद'च्या संशयावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळल्याची थरकाप उडवणारी घटना राजस्थानमधील राजसमंदमध्ये घडलीय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 7, 2017 05:02 PM IST

राजस्थानमध्ये 'लव्ह जिहाद'च्या संशयावरून एकाची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळला

07 डिसेंबर : 'लव्ह जिहाद'च्या संशयावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळल्याची थरकाप उडवणारी घटना राजस्थानमधील राजसमंदमध्ये घडलीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यस्थानात तणाव निर्माण झाला आहे.

राजस्थानमधील राजसमंदमध्ये राजनगर भागातील पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावरही घटना घडलीये. सुरुवातील पोलिसांना एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर एक व्हिडिओ समोर आलाय. त्यावरून लव्ह जिहादच्या संशयावरून या तरुणाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. मृताचं नाव मोहम्मद भुट्टा शेख आहे.  आरोपी शंभूनाथ आणि मोहम्मद शेख दोघेही एकत्र एका दुचाकीवरून अज्ञात स्थळी पोहोचतात. तिथे पोहचल्यावर आरोपीने कुदळीने मोहम्मद शेखवर हल्ला केला. या हल्ल्यात मोहम्मद शेख जागीच कोसळला. आरोपी शंभूनाथ एवढ्यावरच थांबला नाही. त्याने कोयता घेऊन सपासप वार केले. यात मोहम्मद शेखचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर 'लव्ह जिहाद' संपला नाही तर प्रत्येक भारतीयाला अशा भयानक परिस्थितीचा सामना करावा लागेल, आमच्या देशात लव्ह जिहाद पसरवणाऱ्याचे असेल हाल होणार असं म्हणत त्याने मोहम्मद शेखचा मृतदेह पेटवून दिला.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 05:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...