Home /News /national /

VIDEO : RSS दहशतवादी संघटना असल्याचा माझ्याकडे पुरावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकरांचा गंभीर आरोप

VIDEO : RSS दहशतवादी संघटना असल्याचा माझ्याकडे पुरावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकरांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना भारतातली दहशतवादी संघटना असून माझ्याकडे यासंबंधीचे पुरावे असल्याचा गंभीर आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकरांनी केले आहेत. काय म्हणाले राजरत्न? पाहा VIDEO

    बंगळुरु 27 जानेवारी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना भारतातली दहशतवादी संघटना असून माझ्याकडे यासंबंधीचे पुरावे असल्याचा गंभीर आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकरांनी केले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानं एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर, राजरत्न आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणावी अशी मागणीही केली आहे. राजरत्न आंबेडकर यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये राजरत्न संघावर हल्ला चढवताना दिसत आहेत. ‘तुम्ही लोकांनी माझा पाकिस्तानातील व्हिडिओ पाहिलाच असेल. आरएसएस ही भारतातील दहशतवादी संघटना आहे हे मी तिथे म्हणालो होतो. आरएसएसवर बंदी घाला, माझ्याकडे पुरावे आहेत,' असं म्हणाता ते या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींशेजारी बसलेली साध्वी मुलाखतीत सांगते की, भारतीय सैन्याजवळील दारूगोळा संपला, बंदुका, स्फोटकं संपली; तेव्हा आरएसएसनं स्फोटकं, दारुगोळा, बंदुका, बॉम्ब भारतीय सैन्याला पुरवले होते,', असंही ते या व्हिडिओमध्ये बोलत आहेत. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात बॉम्ब आले कुठून? इतका दारुगोळा कुठून आला? बंदुका कुठून आल्या?, असा प्रश्नही राजरत्न आंबेडकरांनी उपस्थित केला. पंतप्रधानांच्या बाजूला बसून या साध्वी असं वक्तव्य करतात. ज्या घरांमध्ये दारुगोळा सापडला, ती घरे किंवा त्या घरांमधील मुलं-माणसांना दहशतवादी म्हणणार नाहीत काय? ज्या संघटनेकडे इतक्या मोठ्या प्रमाणात दारूगोळा आहे ती संघटना दहशतवादी नाही का? या संघटनेचं लोक दहशतवादी कारवायांमध्ये पकडले जात आहेत. अशा संघटनांवर जगात बंदी घालण्यात यावी. ते काम आम्ही करत आहोत, असंही राजरत्न म्हणाले. - अन्य बातम्या 'अदनान सामीला 'पद्मश्री' देऊन मोदी सरकारकडून मुस्लिम मतांचं डॅमेज कंट्रोल' मला हिंदूहृदयसम्राट म्हणणे बंद करा, राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना तंबी राष्ट्रवादीकडून घडली मोठी चूक, प्रजासत्ताक दिनी वापरला देशाचा चुकीचा नकाशा
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: RSS

    पुढील बातम्या