मराठी बातम्या /बातम्या /देश /

लोकसभा निवडणुकीत रजनीकांतचा पाठिंबा कुणाला? जाहीर केली भूमिका

लोकसभा निवडणुकीत रजनीकांतचा पाठिंबा कुणाला? जाहीर केली भूमिका

Chennai:  Tamil actor Rajinikanth gestures while announcing his political entry, on the final day of a six-day-long photo session with fans, in Chennai on Sunday. The announcement ended years of speculation about his joining of politics. PTI Photo by R Senthil Kumar  (PTI12_31_2017_000057B)

सुपरस्टार रजनीकांत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे.

    चेन्नई, 17 फेब्रुवारी : सुपरस्टार रजनीकांत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. 'माझा पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नसून आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही,' अशी भूमिका रजनीकांत यांनी घेतली आहे. 'माझा पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार नसून आगामी विधानसभा निवडणूक हे आमचे प्रमुख लक्ष आहे,' असं एका पत्रकाद्वारे रजनीकांत यांनी म्हटलं आहे. रजनीकांत यांच्या या भूमिकेमुळे तामिळनाडूतील राजकारणार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा स्टॅलिन यांच्या पक्षाला होण्याची शक्यता आहे. पाणी हाच मुख्य मुद्दा तामिळनाडूतील अनेक भागांत सध्या पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे हा प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचं रजनीकांत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याच्या प्रश्नावर काम करून लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न रजनीकांत यांच्याकडून केला जाईल, असं चित्र आहे. भाजपला धक्का? रजनीकांत यांचा पक्ष निवडणुकीआधी किंवा निवडणुकीनंतर भाजपला मदत करेल, अशी चर्चा होती. पण रजनीकांत यांच्या नव्या भूमिकेमुळे भाजपला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. 'कुणी नाही वाचलं', Pulwama Attack चा काही क्षणानंतरचा EXCLUSIVE VIDEO
    First published:

    Tags: Loksabha, Rajnikant

    पुढील बातम्या