रजनीकांतची नवी वेबसाईट लाँच!

रजनीकांतची नवी वेबसाईट लाँच!

रजनीकांतने ही वेबसाईट काढली आहे. तसंच आपल्या चाहत्यांना या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करा अशी मागणी केली आहे.

  • Share this:

01 जानेवारी: राजकारणात येण्याची घोषणा केल्यानंतर आता रजनीकांत राजकीय दृष्ट्या सक्रीय होण्यासाठी इंटरनेटच्या जगात पाऊल ठेवतोय. www.rajanimandiram.com ही नवीन वेबसाईट त्याने लाँच केली आहे.

31 डिसेंबरला  आपण राजकारणात येणार असल्याचा निर्णय रजनीकांतने जाहीर केला. रजनीकांतने राजकारणात यावं म्हणून बऱ्याच वर्षांपासून मागणी केली जात होती.पण अखेर रजनीकांतने हा निर्णय घेतलाच . बिघडलेलं राजकारण पाहता आता  राज्यात राजकीय बदलाची गरज असल्याचं वक्तव्य रजनीकांतने केलं होतं. याच बदलासाठी रजनीकांत राजकारणात येणार आहे.  हा बदल घडून यावा म्हणून रजनीकांतने ही वेबसाईट काढली आहे. तसंच आपल्या चाहत्यांना या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन  करा अशी मागणी केली आहे.

आता रजनीकांतच्या या वेबसाईटला कसा पाठिंबा मिळतो  तसंच रजनीकांतच्या एन्ट्रीनंतर राजकारण कसं ढवळून निघतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2018 06:30 PM IST

ताज्या बातम्या