फक्त पाक व्याप्त काश्मीर(POK) बद्दल चर्चा होईल; राजनाथ सिंह यांनी दिले सडेतोड उत्तर!

फक्त पाक व्याप्त काश्मीर(POK) बद्दल चर्चा होईल; राजनाथ सिंह यांनी दिले सडेतोड उत्तर!

पाकच्या थयथयाटाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट: जम्मू-काश्मीर(Jammu Kashmir)ला विशेष दर्जा देणारे कलम 370 (Article 370) हटवल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर थयथयाट करण्यास सुरूवात केली. चीनच्या मदतीने हा प्रश्न संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत देण्याचा प्रयत्न देखील केला. पाकच्या या प्रयत्नांना देखील अपयश मिळाले. पाकच्या या थयथयाटाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सिंह यांनी पाकिस्तानमधील इमरान खान सरकारला स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, भारत आणि पाक यांच्यात आता केवळ पाकिस्तानच्या ताब्यात असेल्या कश्मीरबाबत (POK) चर्चा केली जाईल. हरियाणा येथील कालका येथे एका सभेत बोलताना सिंह यांनी पाकला हा इशारा दिला. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानला ही भिती वाटते की जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर भारत पुन्हा एकदा POKमध्ये बालाकोट सारखी मोठी कारवाई करेल.

पुलवामा येथे CRPFच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचे ठरवले होते. भारताच्या हवाई दलाने POKमध्ये बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करत त्यांना ठार केले होते. तेव्हा इमरान खान यांनी वारंवार सांगितले होते की आमचा एक ही व्यक्ती ठार झाला नाही. पण आता ते हे मान्य देखील करतात आणि त्यांना पुन्हा एकदा हल्ला होईल याची भिती देखील वाटते. पाक व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात, भारतीय बालाकोटपेक्षा मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. यावरून स्पष्ट होते की पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी देखील हे स्विकारले आहे की बालाकोटमध्ये भारताने हल्ला केला होता, असे राजनाथ म्हणाले.

कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे आणि जगभरातून मदत मागत आहे. पण त्यांना कोणीच विचार नाही. सर्व जगाला माहित आहे की पाकिस्तानने दहशतवाद्यांना संरक्षण दिले आहे. आता तर अमेरिकेच्या अध्यक्षांनी देखील स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, भारतासोबत चर्चा करून प्रश्न सोडवा. आमच्याकडे येऊ नका.

VIDEO: '...तर मी लोकांना सांगेन कायदा हातात घ्या आणि धुलाई करा'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 03:40 PM IST

ताज्या बातम्या