...म्हणून घाबरून पळाले नीरव, माल्या आणि चोक्सी - राजनाथ सिंह

...म्हणून घाबरून पळाले नीरव, माल्या आणि चोक्सी - राजनाथ सिंह

काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा नीरव मोदी, विजय माल्या आणि मेहुल चोक्सी देशात राहूनच आपल्याला लुटत होतं.

  • Share this:

बुलंदशहर, 5 एप्रिल : लोकसभा निवडणुकीचे ज्वर वाढत असताना, सत्ताधारी आणि विरोध यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या प्रचाराची तोफ डागत, उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून काँग्रेसवर हल्ला चढवला. यावेळी राजनाथ सिंह यांनी, काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा नीरव मोदी, विजय माल्या आणि मेहुल चोक्सी देशात राहूनच आपल्याला लुटत होतं. मात्र काँग्रेसचं सरकार देशातून गेलं आणि सतर्क चौकीदार देशात आला तेव्हा या तिघांनी भारतातून पळ काढला, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

दरम्यान याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदी, विजय माल्या आणि मेहुल चोक्सी यांच्याविरोधात आम्ही पावलं उचलली म्हणूनच या तिघांवर परदेशात कारवाई झाली. काँग्रेस सरकारच्या काळातच त्यांनी देशाला लुटलं होतं, असं म्हणत भाजपला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसवरच पलटवार केला आहे.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे आयोजित केलेल्या जनसभेला राजनाथ सिंह आणि उत्तप प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबोधित केले. यावेळी आदित्यनाथ राहुल गांधींना टार्गेट करत, राहुल गांधी यांना अमेठी येथून पराभव होईल या भितीनेच ते वायनाड येथून निवडणूक लढवणार आहेत, अशी थट्टा केली. तर, जी मुस्लिम लीग देशाच्या विभाजनाचे मुख्य कारण बनली होती, त्यांच्यासोबत काँग्रेसनं का गठबंधन केलं, असा प्रश्नही योगी यांनी उपस्थित केला.

VIDEO: राहुल गांधींनी पुण्याच्या ईशाला दिली लोकसभेची ऑफर

First published: April 5, 2019, 2:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading