'हम तुम्हे चैन से मरने भी नहीं देंगे', राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सज्जड दम

'हम तुम्हे चैन से मरने भी नहीं देंगे', राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सज्जड दम

भारताला धोका पोहोचवणाऱ्यांना आम्ही शांततेने मरूही देणार नाही, असं रोखठोक वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं. पुलवामा हल्ल्यात आपल्या जवानांनी दिलेलं बलिदान आपण विसरू शकत नाही, असंही राजनाथ सिंह म्हणाले.

  • Share this:

कोल्लम (केरळ), 27 सप्टेंबर :  पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. दहशतवादी हल्ल्यांसाठी सागरी मार्गांचा अवलंब होण्याची शक्यता आहे पण आम्ही सागरी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली आहे, असं त्यांनी सांगितलं.

भारताला धोका पोहोचवणाऱ्यांना आम्ही शांततेने मरूही देणार नाही, असं रोखठोक वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं. पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमधल्या दहशतवादी तळाला लक्ष्य करून भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. त्याचं उदाहरण देऊन राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला धडा शिकवणार असल्याचं सांगितलं.

पुलवामा हल्ल्यात आपल्या जवानांनी दिलेलं बलिदान आपण विसरू शकत नाही, असंही राजनाथ सिंह म्हणाले. पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच भारताच्या हवाई दलाने बालाकोटमध्ये हल्ले केले. आपण कुणाला त्रास देत नाही पण कुणी विनाकारण आम्हाला त्रास दिला तर त्याला आम्ही शांतपणे मरूही देणार नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले.

(हेही वाचा : सीमेजवळ आणखी एक पाकिस्तानी ड्रोन सापडला, शस्त्रास्त्रं आणण्याचा होता डाव)

जो देश आपल्या सैनिकांचं बलिदान लक्षात ठेवत नाही त्याला या जगात कुठेही आदर दिला जात नाही, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे दोन्ही नेते आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत एकमेकांच्या समोर येणार आहेत. काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे.  याच पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनीही पाकिस्तानबद्दल केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे.

================================================================================

VIDEO :...म्हणून ईडी कार्यालयात जाणार होतो, पवारांचा खुलासा आणि मानले सेनेचे आभार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 06:44 PM IST

ताज्या बातम्या