एअर स्ट्राईकने पाकिस्तानसह भारतातील काही नेते दु:खी- राजनाथ सिंह

एअर स्ट्राईकने पाकिस्तानसह भारतातील काही नेते दु:खी- राजनाथ सिंह

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान दु:ख झाले होते. पण दुर्दैव म्हणजे देशातील काही राजकीय पक्षातील नेत्यांना देखील याचे दु:ख झाले आहे, अशा शब्दात एअर स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हल्ला चढवला.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 मार्च: जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर भारतीय हवाई दलाने 13व्या दिवशी बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय हवाई दलाने केलेल्या या कामगिरीचे संपूर्ण देशाचे कौतुक केले आणि त्यांच्या शौर्याला सलाम केला. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान दु:ख झाले होते. पण दुर्दैव म्हणजे देशातील काही राजकीय पक्षातील नेत्यांना देखील याचे दु:ख झाले आहे, अशा शब्दात एअर स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हल्ला चढवला.

न्यूज 18ला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंग यांनी सांगितले की, संपूर्ण देश हवाई दलाचे कौतुक करत असताना देशाली काही ज्येष्ठ नेते मात्र एअर स्ट्राईकवर शंका उपस्थित करत आहेत. एअर स्ट्राईकमध्ये किती लोक मारले गेले असे विचारणे फारच दुर्दैवी आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ नयेत. अशा प्रश्नांमुळे भारतीय लष्कर आणि त्यांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यासारखे वाटते, असे राजनाथ म्हणाले.

भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक केला ही गोष्ट जग जाहीर आहे. त्याचे दु:ख पाकिस्तानला झाले. पण मला आश्चर्य तेव्हा वाटते की इतक्या स्पष्ट गोष्टीवर काही जण प्रश्न उपस्थित करतात. भारतात राहणारे काही राजकीय पक्षाचे नेते इतक्या दु:खात का आहेत? पाकिस्तानच्या दु:खाचे कारण समजू शकते पण भारतीय नेत्यांचे दु:खाचे कारण मला समजत नाही, असे सिंग म्हणाले.

मार्केटिंग केले नाही

भारतीय हवाई दलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे भाजपने कधीच मार्केटिंग केले नाही. आम्ही हवाई दलाच्या जवानांच्या शौर्याचे कौतुक केले आणि तसेच करणे गरजेचे होते. कारण पाकिस्तानला धडा शिकवल्यामुळे आम्हाला अभिमान वाटत होता, असे सिंग यांनी सांगितले.

...तरच पाकिस्तानशी चर्चा शक्य

भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करायची असेल तर प्रथम त्यांनी सर्व दहशतवादी संघटना नष्ट कराव्यात. पाकच्या भूमीवरुन कोणत्याही प्रकारचे दहशतवादी कृत्य होऊ नये. पाक सरकारकडून दहशतवादी संघटनांना संरक्षण मिळू नये. जर अशा प्रकारचे प्रयत्न झाले तर पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते. दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही. पाकिस्तानकडून थोडा तरी प्रामाणिक प्रयत्न दिसला पाहिजे.

पाकिस्तानने दहशवाद्यांचा खात्मा करावा आणि ठामपणे सांगावे की आमच्या भूमीवर दहशतवादाला थारा नाही. पाकिस्तान आपला शेजारचा देश आहे. त्याच्यासोबतचे संबंध चांगले असावेत असे आम्हाला देखील वाटते, असे सिंग म्हणाले.

VIDEO : सर्जिकल स्ट्राइकच्या मार्केटिंगवर काय म्हणाले राजनाथ सिंह?

First published: March 16, 2019, 2:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading