मराठी बातम्या /बातम्या /देश /भारत-चीन परिस्थितीबद्दल दिल्लीत बैठक; राजनाथ सिंह यांच्यासोबत ए. के. अँटनी, शरद पवारांची उच्चस्तरीय बैठक पार

भारत-चीन परिस्थितीबद्दल दिल्लीत बैठक; राजनाथ सिंह यांच्यासोबत ए. के. अँटनी, शरद पवारांची उच्चस्तरीय बैठक पार

India-China standoff: चीन कुरापती करणं कमी करत नाही आणि भारतीय सैन्य त्या कुरापती आणि घुसखोरीचे प्रयत्न मोडून काढत आहे.

India-China standoff: चीन कुरापती करणं कमी करत नाही आणि भारतीय सैन्य त्या कुरापती आणि घुसखोरीचे प्रयत्न मोडून काढत आहे.

India-China standoff: चीन कुरापती करणं कमी करत नाही आणि भारतीय सैन्य त्या कुरापती आणि घुसखोरीचे प्रयत्न मोडून काढत आहे.

नवी दिल्ली, 17 जुलै:   गेल्यावर्षी लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (India China Standoff) वाद झाल्यावर चीन आणि भारतातील संबंध अधिक तणावपूर्ण झाले होते. चीन कुरापती करणं कमी करत नाही आणि भारतीय सैन्य त्या कुरापती आणि घुसखोरीचे प्रयत्न मोडून काढत आहे. याचबरोबर पाकिस्तानही देशांतर्गत दहशतवादासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया, घुसखोरी करत आहे. भारतीय लष्कर आणि संरक्षण दलं सर्व आघाड्यांवर सज्ज असून चीन आणि पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. या सर्वांत महत्त्वाचं म्हणजे संरक्षणमंत्री राजनाथसिंह  (Rajnath Singh) यांनी देशाचे माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी (Congress Leader AK Antony)आणि शरद पवार यांच्यासोबत ( Nationalist Congress Party President Sharad Pawar) बैठक करून भारत-चीन परिस्थितीबद्दल त्यांना माहिती दिली. ही बैठक खूप उच्चस्तरीय होती. या बैठकीला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल मुकुंद नरवणेही उपस्थित होते. टीव्ही 9 भारतवर्षने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

LAC वर भारतीय सैन्य सज्ज

चीनसोबतच्या LAC वर सातत्याने काही कुरापाती सुरू आहेत. चीनचे घुसखोरीचे मनसुबे धुळीला मिळवण्यासाठी भारतीय सैन्य दलं सज्ज असून ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ते सतत सज्ज आहेत. या भागात 2 लाखांचं सैन्य त्याचबरोबर तोफा, मिसाइल्स तैनात करण्यात आली आहेत. गेल्यावर्षी जूनमध्ये भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर देत चिनी सैन्याला LAC वरून मागे हटण्यास भाग पाडल्यानंतर आता पुन्हा एकदा चीनने घुसखोरीचे प्रयत्न सुरू केले आहेत पण आपलं सैन्य तिथं दिवसरात्र तैनात आहे.

VIDEO : Journalist Danish Siddiqui च्या मृत्यूनंतर तालिबानींनी जारी केलं वक्तव्य; भारतीय पत्रकारांना दिला हा सल्ला

या भागात दीर्घकाळ राहण्याची चीनची तयारी

सिक्कीममधील नाकू ला आणि पूर्व लडाखमध्ये LAC जवळ भारतीय सैन्याला काही पर्मनंट ट्रुप्स इन्फ्रास्ट्रक्चर उभारल्याचं लक्षात आलंय. या इमारती चीनने उभारल्या असून या भागात पुन्हा घुसखोरी करण्याचा त्यांचा मनसुबा असल्याचं या इमारतींवरून स्पष्ट होत आहे. पण भारतीय सैन्य दलं कायम अलर्टवर आहेत. त्या भागात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर ती बारीक लक्ष ठेवून आहेत. एएनआच्या सूत्रांच्या हवाल्याने टीव्ही 9 भारतवर्षने वृत्त दिलंय की, या नव्याने उभारलेल्या सैनिकी इमारतींमध्ये चीन लवकरच आपले PLA चे सैनिक तैनात करणार आहे. गेल्यावेळे पेक्षा प्रतिबंधित क्षेत्रात आता या चिनी सैनिकांना लवकर पोहोचता येईल. त्यामुळे या वेळी आपल्या लष्करालाही कमी वेळात कारवाई करावी लागणार आहे आणि त्यासाठीही जवान सज्ज आहेत.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार: सूत्र

चीनने बांधलेल्या या इमारती अरुणाचल प्रदेशातील चीनशी लागून असलेल्या सीमा भागातही आहेत. थंडीच्या दिवसांत या इमारतींत थांबून LAC वर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यास चीनच्या सैन्याला या इमारतींमुळे मदत होणार आहे. या सर्व परिस्थितीची माहिती देण्यासाठीच ही उच्चस्तरीय बैठक झाली असून, त्यात झालेल्या निर्णयानुसार भारतीय सैन्यदलं कारवाई करतील.

First published:

Tags: China, India china, Rajnath singh