वाटेल ते करू पण कुलभूषण जाधवांना परत आणू, राजनाथ सिंहांचं आश्वासन

वाटेल ते करू पण कुलभूषण जाधवांना परत आणू, राजनाथ सिंहांचं आश्वासन

  • Share this:

11 एप्रिल :  कुलभूषण जाधव यांना परत आणण्यासाठी आम्ही वाटेल ते करू पण त्यांना परत आणू असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली आहे. कुलभूषण जाधव जर भारतीय हेर असेल तर त्याच्याकडे अधिकृत भारतीय व्हिसा कसा असेल असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला.

भारतीय हेर असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना अटक केली होती. मात्र कुलभूषण जाधव हेरगिरी करत असल्याचा ठोस पुरावा पाकिस्तानला मिळू शकला नाही. यानंतरही सोमवारी पाकिस्तानने जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे खटला पाकच्या कोर्टात न चालता घाईघाईनं लष्करी कोर्टात चालवण्यात आला.

जाधव यांना शिक्षा सुनावल्याचा मुद्दा आज (मंगळवारी) संसदेत उपस्थित झाला. काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खडगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. कोणत्याही परिस्थितीत जाधवना वाचवलं पाहिजे, यावर लोकसभेत एकमत झालं. यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सरकारची भूमिका मांडली. काहीही करून आम्ही कुलभूषण जाधव यांना परत आणू, असं ते म्हणाले.  त्याचबरोबर, जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असं राजनाथ सिंह म्हणालेत.

याशिवाय, शशी थरूर यांनी पाकला यावेळी फैलावर घेतलं. पाकनं त्यांच्या कायद्याचंच नाही तर सर्व जागतिक कादये आणि नियमांचं उल्लंघन केलं. जाधवना पाकमधल्या भारताच्या उच्चायुक्तांनाही भेटू दिलं नाही, यावरही थरूर यांनी टीका केली. त्याचबरोबर, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही यामुद्द्यावर आज लोकसभेत भाष्य केलं आहे. सरकारनं पूर्ण प्रयत्न करावेत, असं राऊत म्हणाले.

जाधव हे भारताचे हेर आहेत, असा ठपका ठेवत पाकनं त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे खटला पाकच्या कोर्टात न चालता घाईघाईनं लष्करी कोर्टात चालवण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 02:42 PM IST

ताज्या बातम्या