मराठी बातम्या /बातम्या /देश /

Corona Vaccination : लसवंत नागरिकांना 50 हजारांचा मोबाईल जिंकण्याची संधी, 'या' महापालिकेची खास मोहिम

Corona Vaccination : लसवंत नागरिकांना 50 हजारांचा मोबाईल जिंकण्याची संधी, 'या' महापालिकेची खास मोहिम

राजकोट महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांना लकी ड्रॉ काढला जाणार आहे. यामध्ये नागरिकांना 50 हजारांचा मोबाईल जिंकण्याची संधी मिळणार आहे.

    गांधीनगर, 5 डिसेंबर : कोरोनाचा (Coronavirus) समूळ नायनाट करण्यासाठी संपूर्ण लसीकरण (Corona Vaccination) वेगाने होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र काही नागरिक अजूनही लसीकरणासाठी टाळाटाळ करताना दिसत आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी लोकांना आकर्षित करण्यासाठी गुजरातमधील राजकोट महापालिकेने (Rajkot Municipal Corporation) अनोखी शक्कल लढवली आहे. राजकोट महापालिकेने लसीचा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लकी ड्रा सुरु केला आहे. या लकी ड्रॉमध्ये कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांना 50 हजारांचा मोबाईल जिंकण्याची संधी मिळत आहे. राजकोट महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीचा दुसरा डोस (Corona Second Dose) घेतलेल्या नागरिकांना लकी ड्रॉ काढला जाणार आहे. यामध्ये नागरिकांना 50 हजारांचा मोबाईल जिंकण्याची संधी मिळणार आहे. मात्र महापालिकेने यासाठी एक अटही ठेवली आहे. या अटीनुसार कोरोनाचा दुसरा डोस 4 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान घेतलेला असणे गरजेचं आहे. यासाठी स्पेशल लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे. टांझानियावरुन दिल्लीत परतलेल्या प्रवाशाला Omicron ची लागण Omicron व्हेरिएंटचं WhatsApp स्टेट्स ठेवणं पडलं महागात महापालिका आयुक्त अमित अरोडा यांनी म्हटलं की, विजेता लकी ड्रॉ च्या माध्यमातून निवडला जाणार आहे. विजेत्याला 50 हजारांचा मोबाईल दिला जाणार आहे. तसेच लसीकरण मोहिमेदरम्यान सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या स्वास्थ्य केंद्राला 21 हजारांचं बक्षिस दिलं जाणार आहे. तसेच वॅक्सिनेशनच्या दुसऱ्या डोसचा वेग वाढवण्यासाठी हेल्थ टीमसाठी इन्सेटिव्हचीही घोषणा केली जाणार आहे. राजकोट महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, राजकोटमधील सुमारे 1.82 लाख लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस घेणे बाकी आहे. विशेष मोहिमेदरम्यान शहरातील सर्व 22 आरोग्य केंद्रांवर 12 तास (सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत) जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्याचे काम केले जाणार आहे. अलीकडेच गुजरातमधील आणखी एका शहरानेही अशीच मोहीम सुरू केली आहे. अहमदाबाद नागरी संस्थेने लकी ड्रॉ देखील आयोजित केला आहे. ज्यामध्ये विजेत्याला 60,000 रुपयांचा स्मार्टफोन मिळेल. ज्यांना 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान कोरोनाचा दुसरा डोस मिळेल. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Corona, Health

    पुढील बातम्या