गुजरातमध्ये खासदार राजीव सातवांना पोलिसांकडूनच मारहाण

गुजरातमध्ये खासदार राजीव सातवांना पोलिसांकडूनच मारहाण

राजकोट पश्चिम येथील काॅंग्रेसचे उमेदवार इंद्रनील राज्यगुरु यांचा धाकटा भाई दीपू राज्यगुरु यांच्यावर काल हल्ला झाला. राजू डांगर या व्यक्तीनं हा हल्ला केल्याचा आरोप केला जातोय. तसंच राजू हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा स्थानिक भाजप नेत्यांचा आरोप आहे. काॅंग्रेस निवडणूक पोस्टर्स काही ठिकाणी काढली जात असल्याचा मुद्दयावर राजू आणि दीपू यांच्यात हाणामारी झाली

  • Share this:

 राजकोट 03 डिसेंबर:  गुजरातच्या राजकोटमध्ये निवडणुकीला काल काहीसं हिंसक वळण लागलं. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या घरासमोर निर्दशर्न करत असताना त्यांना पोलिसांनी मारहाण केली नंतर त्यांची अटक करण्यात आली आणि मग जामिनावर सुटका झाली.

राजकोट पश्चिम येथील काॅंग्रेसचे उमेदवार इंद्रनील राज्यगुरु यांचा धाकटा भाई दीपू राज्यगुरु यांच्यावर काल हल्ला झाला.  राजू डांगर या व्यक्तीनं हा हल्ला केल्याचा आरोप केला जातोय. तसंच राजू हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा स्थानिक भाजप नेत्यांचा आरोप आहे. काॅंग्रेस निवडणूक पोस्टर्स काही ठिकाणी काढली जात असल्याचा मुद्दयावर राजू आणि दीपू यांच्यात हाणामारी झाली असल्याची माहिती मिळते आहे.

या प्रकारानंतर इंद्रनील राज्यगुरू आणि राजकोट पूर्वचे काॅंग्रेसचे उमेदवार मितूल डोंगा हे आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. हा प्रकार सुरु असताना रुपानी आपल्या निवासस्थानात होते.

या सगळ्या कार्यकर्त्यांना समजावूनही परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल म्हणून राजगुरू डोंगा यांना ताब्यात घेण्यात आलं असं राजकोटचे पोलीस सहआयुक्त दीपक भट्ट यांनी सांगितलं. या प्रकारानंतर काॅंग्रेसचे खासदार राजीव सातव हे पोलीस स्टेशनला गेले असताना त्यांना देखील पोलिसांनी मारहाण केली असल्याचा आरोप काॅंग्रेसने केला आहे. आता या सगळ्यांना पोलिसांनी सोडून दिलं आहे.

 

पण या सगळ्या प्रकारामुळे काॅंग्रेस विरुद्ध भाजप हा संघर्ष तीव्र झाला आहे. दरम्यान काल रात्रीच्या या प्रकारानंतर रुपानी यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

राहूल गांधींनी राजीव सातव यांच्याशी संवाद साधला. भाजपला पराभव दिसत असल्यानेच गुजरात पोलीस असं वागले अशी राहूल यांनी सातव यांच्याकडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2017 01:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading