मराठी बातम्या /बातम्या /देश /

नवा ट्विस्ट : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी रजनीकांत घेणार मोठा निर्णय?

नवा ट्विस्ट : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी रजनीकांत घेणार मोठा निर्णय?

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी (Tamil Nadu Assembly Election 2021) राज्यातील राजकारणात सातत्यानं बदल होत आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी (Tamil Nadu Assembly Election 2021) राज्यातील राजकारणात सातत्यानं बदल होत आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी (Tamil Nadu Assembly Election 2021) राज्यातील राजकारणात सातत्यानं बदल होत आहे.

  • Published by:  News18 Desk

चेन्नई, 4 फेब्रुवारी :  तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी (Tamil Nadu Assembly Election 2021) राज्यातील राजकारणात सातत्यानं बदल होत आहे. सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांनी  यापूर्वी 31 डिसेंबर 2020 रोजी नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या शेवटी त्यांची प्रकृती बिघडली. बिघलेली प्रकृती हा देवाचा इशारा असल्याचं मानत रजनीकांत यांनी राजकीय मैदानातून माघार घेतली होती. आता रजनीकांत यांचे जवळचे सहकारी टी. मणियन यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या प्रकरणात आणखी एक अंक लवकरच रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

“रजनीकांत यांनी राजकारणात येणार नाही असं कधीही म्हंटलेलं नाही. त्यांनी सध्या निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली आहे, असा दावा टी मणियन यांनी केला आहे. रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंडलम (RMM) ही संघटना विसर्जित केलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. रजनीकांत उद्या राजकारणात आले किंवा आले नाहीत तरीही आपली गांधी मक्कल इयक्कम ही संघटना त्यांना सहकार्य करेल असे मणियन यांनी स्पष्ट केलं.’टाईम्स ऑफ इंडिया’ नं हे वृत्त दिलं आहे. मणियन यांच्या ताज्या वक्तव्यामुळे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी रजनीकांत पुन्हा एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डिसेंबरमध्ये काय केली होती घोषणा?

यापूर्वी 30 डिसेंबर 2020 रोजी मणियन यांनीच ‘रजनीकांत आता राजकारण सोडत असून ते पुन्हा कधीही राजकारणात येणार नाहीत,’ असं वक्तव्य केलं होतं. काही राजकीय शक्ती RMM च्या पदाधिकाऱ्यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. RMM मधील काही जण अन्य राजकीय पक्षात दाखल झाले आहेत. तर काही अजूनही प्रवासी पक्षासारखं संधी शोधत आहेत, असा दावा मणियन यांनी केला आहे. “या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची माझी इच्छा नाही. पक्षाच्या जनरल कौन्सिलची बैठक 7 मार्च रोजी तिरुपूरमध्ये होणार आहे,’’ असं मणियन यांनी स्पष्ट केलं आहे.

यापूर्वी मागच्या वर्षी रजनीकांत यांनी एक पत्र लिहलं होतं. “COVID19 च्या काळात निवडणूक प्रचारासाठी लोकांची भेट घेणं शक्य नाही. त्यामुळे मी राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला आहे. काही जण राजकारणात न येण्याच्या माझ्या निर्णयावर टीका करु शकतात. मला कोणतीही जोखीम घ्यायची नाही. हा निर्णय घेताना मला किती वाईट वाटलं हे मला माहिती आहे,’’ असं रजनीकांत यांनी या पत्रात स्पष्ट केले होते.

First published:

Tags: Tamil nadu