'PM मोदी, अमित शहा म्हणजे कृष्ण आणि अर्जुनची जोडी'

'PM मोदी, अमित शहा म्हणजे कृष्ण आणि अर्जुनची जोडी'

रजनीकांत यांनी प्रथमच कलम 370 हटवण्यावर भाष्य केले आहे आणि हे भाष्य मोदी आणि अमित शहा यांच्या संदर्भातील आहे.

  • Share this:

चेन्नई, 11 ऑगस्ट: दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत अद्याप राजकारणात सक्रीय नाहीत. पण रजनीकांत यांनी केलेली राजकीय वक्तव्य नेहमीच चर्चत असतात. केवळ तामिळनाडूच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील घटनेवर देखील रजनीकांत भाष्य करत असतात. काहीच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसाठीचे कलम 370 हटवल्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे भरपूर कौतुक करत आहेत. याच निर्णयावर आता रजनीकांत यांनी प्रथमच भाष्य केले आहे आणि हे भाष्य मोदी आणि अमित शहा यांच्या संदर्भातील आहे.

चेन्नई आयोजित एका कार्यक्रमात बोलताना रजनीकांत यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वगत केले आणि कौतुक देखील केले. या निर्णयासाठी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले. रजनीकांत यांनी अमित शहा आणि PM मोदींना कृष्ण आणि अर्जुनाची जोडी असल्याचे सांगितले. अमित शहांनी मिशन कश्मीर पूर्ण केल्याबद्दल तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तुम्ही ज्या पद्धतीने हे काम पूर्ण केले आहे जबरदस्त होते. ज्या पद्धतीने तुम्ही संसदेत भाषण केले ते जबरदस्त होते सर असे रजनीकांत म्हणाले.

दुसरीकडे अमित शहा यांनी कलम 370 हटवल्यामुळे काश्मीरमधील दहशतवाद संपले आणि विकासाचा मार्ग मोकळा होईल असे पुन्हा एकदा स्पष्ट केले. उपराष्ट्रपती व्यंकय्य नायडू यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

VIDEO : अजित पवारांनी सांगितली पूरग्रस्त निष्पाप मुलाची व्यथा

First published: August 11, 2019, 3:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading