Elec-widget

निर्लज्जपणा, निवडणुकीमुळे सामूहिक बलात्काराची घटना 4 दिवस दाबून टाकली!

निर्लज्जपणा, निवडणुकीमुळे सामूहिक बलात्काराची घटना 4 दिवस दाबून टाकली!

राजस्थानमध्ये सामूहिक बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • Share this:

अलवर, 07 मे: राजस्थानमध्ये सामूहिक बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाच नराधमांनी मिळून एका महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार केला. ही धक्कादायक घटना एवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही. या घटनेची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी चार दिवस टाळाटाळ केली. पोलिसांनी निवडणुकीच्या कामाचे कारण सांगत ही संपूर्ण घटना दाबून टाकली होती.

अलवर जिल्ह्यातील थानागाजी परिसरात ही घटना घडली आहे. एका महिलेवर तिच्या पतीसमोरच अत्याचार करण्यात आला. ही प्रकार घडत असताना आरोपींनी त्याचा व्हिडिओ देखील तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. पीडित महिला 26 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता पतीसह मोटरसायकलवरून लालवाडीहून तालवृक्षकडे जात होती. थानागाजी-अलवर बायपास रोडवर दुहार चौगान या रस्त्यावर दोन दुचाकीवरून आलेल्या ५ युवकांनी त्यांना थांबवले. हे सर्व युवक 20 ते 25 वयोगटातील होते. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्या युवकांनी पतीला मारहाण केली आणि त्याला बांधून ठेवले. त्यानंतर अत्याचार केला.या घटनेसंदर्भात पोलीस अधिक्षक राजीव पंचार यांनी सांगितले की, पीडित महिला व तिचा पती दोन मे रोजी माझ्याकडे आले होते. मी त्याच वेळी तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश दिले होते. तसेच थानागाजी पोलिसांना एक पथकाची निर्मिती करण्यास सांगितले. पण या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे ते म्हणाले.

Loading...

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेल्या पीडित पती-पत्नींना मानसिक धक्क्यात आहेत. व्हिडिओमध्ये सर्व आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत असतानाही पोलिसांना अद्याप त्यांचा शोध घेता आला नाही. हे प्रकरण चार दिवस दाबून ठेवण्यासंदर्भात विचारणा केल्यास पोलीस ठाण्यातील प्रमुख सरदार सिंह यांनी सांगितले की, संबंधित महिला अनुसूचित जाती-जमातीची आहे त्यामुळे ही घटना कोणाला सांगितली नाही. आरोपींना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे सिंह म्हणाले.


पुणे-सातारा महामार्गावर कारला भीषण आग पाहा LIVE VIDEOबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rajasthan
First Published: May 7, 2019 03:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...