'वायू'वादळाचा फटका, 200 गावांचा वीजपुरवठा झाला बंद

'वायू'वादळाचा फटका,  200 गावांचा वीजपुरवठा झाला बंद

वेगवान वाऱ्यामुळे वीजेचे 500 खांब कोसळून पडले असून 125 ट्रान्सफॉर्म्सही बिघडले आहेत.

  • Share this:

जयपूर, 13 जून : 'वायू'वादळ गुजरातला न धडकता पुढे गेल्याने मोठा धोका टळला. मात्र या वादळामुळे आलेल्या प्रचंड वारा आणि पावसाचा अनेक राज्यांना मोठा फटका बसलाय. राजस्थानमधल्या तब्बल 200 गावांचा वीज पुरवठा बंद झाला असून परिस्थिती पूर्ववत व्हायला काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. अलवरमध्ये पावसामुळे भींत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला.

'वायू'वादळामुळे राजस्थानमध्येही अनेक जिल्ह्यांना वेगवान वारा आणि पावसाचा सामना करावा लागला. वेगवान वाऱ्यामुळे वीजेचे 500 खांब कोसळून पडले असून 125 ट्रान्सफॉर्म्सही बिघडले आहेत. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानेही वीज विभागाला फटका बसलाय. त्यामुळे 200 गावांचा वीज पुरवढाच बंद झालाय. हा वीज पुरवढा पुन्हा सुरू करण्यासाठी वीज विभागाने कामाला सुरूवात केली असून त्यासाठी थोडा वेळ लागणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

गुजरातमध्ये 6 जणांचा मृत्यू

राज्याचं लक्ष सध्या आहे ते वायू चक्रीवादळावर. 'वायू' चक्रीवादळाने दिशा बदलून आता गुजरातच्या दक्षिण समुद्र किनाऱ्याला समांतर अंतराने प्रवास सुरू ठेवला आहे. त्यामुळे 'वायू' चक्रिवादळाचा केंद्रबिंदू थेट समुद्र किनाऱ्याला धडकणार नाही. पण, गुजरातमध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. वेरावळ समुद्र किनाऱ्याजवळ समुद्रात 80 किलोमीटर अंतरावरून हे चक्रीवादळ पश्चिम दिशेला वळलं आहे. गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीवर वेरावळ, पोरबंदर ते द्वारकापर्यंत हे चक्रीवादळ समांतर अंतराने प्रवास करत आहे. त्यामुळे गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर ताशी 150 किमी वेगाने वारे वाहत आहेत.

थेट किनाऱ्याला वायू चक्रीवादळ धडकणार नसलं तरी पोरबंदर समुद्र किनाऱ्याला उधाण आलं आहे. गुजरातमध्ये प्रशासन सज्ज आहे. जवळपास 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून शाळांनाही दोन दिवस सुट्टी देण्यात आली आहे. सध्या पोरबंद इथे ताशी 150 ते 155 किमी वेगानं वारे वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरात प्रशासनानं विमान आणि ट्रेनही रद्द केल्या आहेत.

First published: June 13, 2019, 6:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading