Home /News /national /

लग्न करून 3 दाम्पत्य निघाले दर्शनाला, मग झाला असा अपघात की 7 जणांचा जागीच गेला जीव

लग्न करून 3 दाम्पत्य निघाले दर्शनाला, मग झाला असा अपघात की 7 जणांचा जागीच गेला जीव

आठवड्या भरापूर्वी झालं होतं लग्न, हातावरती मेहंदी उतरण्याआधीच झाला भीषण अपघात

    चितौडगड, 13 डिसेंबर : काळ आणि वेळ कधी कोणावर कशी येईल हे सांगता येत नाही तसंच मृत्यू कधी आणि कसा गाठेल याचा नेम नाही. नवविवाहित दाम्पत्याचा नवा संसार सुरू होण्याआधीच काळानं घाला घातला आणि हातावरच्या मेहंदी अन् हळदीनं रंगलेली नव्या संसाराची स्वप्नांनाही काही क्षण ब्रेक लागला. नुकतच लग्न झालेले तीन दाम्पत्य देव दर्शनाला निघाले असताना वाटेत भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी आहेत. राजस्थानमधील चित्तौडगड जिल्ह्यात रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ता अपघातात 7 जणांचा मृत्यू तर साधारण 10 लोक जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढचा तपास करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार उदयपूर निंबाहेरा रस्त्यावर सादुलखेडाजवळ क्रूझर आणि ट्रकची भीषण धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन जणांनी रुग्णालयात घेऊन जाईपर्यंत प्राण सोडले. तर 10 जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गाड्या हटवल्या आहेत. तर जखमींना देखील रुग्णालयात दाखल केलं. हे वाचा-ए. आर. रेहमानच्या 'त्या' पोस्टवर फक्त एका तासात 1.5 लाख लाईक्स; पाहून थक्क व्हाल सुमारे 12 किलोमीटर आधी ट्रेलरमधून वाहनानं जोरात धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रतलामच्या अख्याकला गावातील लोक क्रूझरमधून देवदर्शनाला निघाले होते. त्यात तीन नवीन विवाहित जोडपे देखील होती ज्यांचे एका आठवड्यापूर्वी लग्न झाले होते. हे 18 लोक चित्तौडगड, सावळियाजी या प्रसिद्ध मंदिरात दर्शनासाठी निघाले असताना हा अपघात घडला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Rajasthan, Truck accident

    पुढील बातम्या