सीकर,13 फेब्रुवारी : गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याच्या बातम्या रोज येत असतात. असाच एक भयंकर प्रकार राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात घडला. सीकर येथील जिल्हा मुख्यालयाच्या शेखपुरा परिसरातील कुरेसिया क्वार्टर इमारतीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भयंकर होता की यात 14 लोक जळाले तर यातील 9 जणांची प्रकृती गंभीर आहे.
या स्फोटात संपूर्ण इमारत हादरली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमींना कल्याण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 9 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जयपूर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिस अधीक्षकांसह अन्य उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी याची माहिती घेतली.
वाचा-‘बघ मी आत्महत्या करतोय’, पतीने फेसबुक LIVE करत संपवलं जीवन
#अखाड़ा; राजस्थान के सीकर में गैस सिलिंडर फटने का सीसीटीवी वीडियो आया सामने. हादसे में 13 लोग झुलसे. वीडियो की कुछ तस्वीरें आपको विचलित कर सकती है.@AnchorAnandN pic.twitter.com/yOqqdEFsBL
— News18 India (@News18India) February 13, 2020
वाचा-मुंबईतल्या अंधेरीत रोल्टा कंपनीली भीषण आग, फायरब्रिगेडच्या 19 गाड्या घटनास्थळी
अपघातात 1 मुल बेपत्ता
कोतवाली पोलिस अधिकारी कन्हैयालाल यांनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीत, शहरातील प्रभाग क्रमांक 33मध्ये असलेल्या कुरेसिया क्वार्टर येथे राहणाऱ्या नंदलाल सिंधी यांच्या घरी हा अपघात झाला. तेथे नाश्ता करताना गॅस गळतीमुळे सिलिंडरमध्ये मोठा स्फोट झाला. त्यावेळी इमारतीत बरेच लोक होते. या अपघातात 14 लोक जखमी झाले. स्फोटामुळे इमारतीचा काही भाग कोसळला. बर्याच ठिकाणी भिंत पडली आणि बर्याच ठिकाणी भेगा पडल्या. या अपघातात 14 लोकांचा मृत्यू झाला. सिलिंडर फुटल्यानंतर एक मूलही बेपत्ता आहे. तो शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वाचा-नवऱ्याचे अश्लिल VIDEO पाहिल्याचा राग, त्याने बायकोलाच पेट्रोल टाकून जाळलं
अधिकारी व लोकप्रतिनिधी रुग्णालयात पोहोचले
अपघातानंतर घटनास्थळी खळबळ माजली. काही लोकांनी तातडीने पोलिसांना कळवले आणि जखमींना कल्याण रुग्णालयात नेले. एकाच वेळी मोठ्या संख्येने लोक जखमी झाल्याने रुग्णालयात गोंधळ झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक गगनदीप सिंगला, आमदार राजेंद्र पारीक आणि नगरपरिषदेचे अध्यक्ष जीवन खान यांनीही घटनास्थळी पोहोचून जखमींची माहिती घेतली.