Home /News /national /

मॉर्निंग वॉक ठरला शेवटचा, भरधाव कारनं वृद्ध व्यक्तीला चिरडलं; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

मॉर्निंग वॉक ठरला शेवटचा, भरधाव कारनं वृद्ध व्यक्तीला चिरडलं; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्ध व्यक्तीला बोलेरो कारनं जोरदार धडक दिली आणि वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

    सीकर, 28 नोव्हेंबर : कोरोनानं नाही तर रस्त्यावर सकाळी मृत्यूनं गाठलं. वृद्ध व्यक्ती मॉर्निंग वॉक करत असताना अपघात झाला आणि या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्यक्तीला भरधाव गाडीनं धडक दिली आणि चिरडलं. मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्ध व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. ही धक्कादायक घटना राजस्थान आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांच्या मध्ये असलेल्या सीकर इथे घटना घडली आहे. सीकर शहरातील पिपरळी रोडवर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्ध व्यक्तीला बोलेरो कारनं जोरदार धडक दिली आणि वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. बोलेरोने वृद्ध व्यक्तीला धडक दिल्याची घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की मागून येणाऱ्या कारनं वृद्ध व्यक्तीला धडक दिली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की कारनं धडक दिल्यानंतर गाडी थांबली नाही तर भरधाव वेगानं निघून गेली आहे. कारनं वृद्ध व्यक्तीला काही अंतर चिरडत नेलं. स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही व्हिडीओच्या मदतीनं गुन्हेगाराचा शोध सुरू आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Rajasthan

    पुढील बातम्या