विकृतीचा कळस! गर्भवती तरुणीवर सामूहिक बलात्कार, नराधमांनी 12 तासांत 11 वेळा केले अत्याचार

विकृतीचा कळस! गर्भवती तरुणीवर सामूहिक बलात्कार, नराधमांनी 12 तासांत 11 वेळा केले अत्याचार

Crime News : पाच जणांनी मिळून एका गर्भवती तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

जयपूर, 14 ऑगस्ट : माणुसकीला काळिमा फासणारी आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. पाच जणांनी मिळून एका गर्भवती तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत नराधमांनी विकृतीचा अक्षरशः कळस गाठला आहे. आपल्या होणाऱ्या पतीसोबत फिरायला गेलेल्या या गर्भवती तरुणीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. संतापजनक बाब म्हणजे या वासनांधांनी 12 तासांमध्ये तिच्यावर तब्बल 11 वेळा सामूहिक अत्याचार केले. तिच्या प्रियकरालाही अमानुष मारहाण केली. ही हादरवणारी घटना राजस्थानमधील बांसवाडा येथील आहे.

(वाचा :सावधान! मॉलच्या लेडिज चेंजिंग रूममध्ये सापडलं 'हे'; रूम वापरण्याआधी हे वाचा)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी दीड महिन्यांची गर्भवती होती. पाच जणांनी केलेल्या अत्याचारामुळे तिचं बाळ या जगात येण्यापूर्वीच दगावलंय. काही दिवसांपूर्वी बस्ती गावातील रहिवासी असलेल्या प्रभू नावाच्या एका तरुणानं आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्या प्रेयसीसोबत घडलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आहे.

(वाचा : रिलेशनशिपमध्ये चीटिंगचा हा नवा प्रकार, तुमच्यासोबत झालंय का 'मायक्रो- चीटिंग')

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्र भराभर फिरवली आणि चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, पाचवा आरोपी फरार असून पोलिसांनी त्याच्यावर 5 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना जवळपास एक महिन्याभरापूर्वी घडली आहे. प्रभू आपल्या होणाऱ्या पत्नीसह फिरण्यास घराबाहेर पडला होता. यावेळी रस्त्यात तीन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रभू आणि त्याची प्रेयसी बेशुद्ध पडले. आरोपींना या दोघांनाही उचलून निर्जनस्थळी नेऊन एका खोलीत बंद केलं. खोलीमध्ये आधीपासूनच या आरोपींचे आणखी दोन साथीदार हजर होते. यानंतर रात्री विकृतीचा कळस गाठणारी घटना घडली. आरोपींनी गर्भवती तरुणीवर वारंवार सामूहिक बलात्कार केला आणि पहाट झाल्यानंतर पीडित तरुणी आणि तरुणाला रस्त्यावर फेकलं.

(वाचा : 'प्यार किया तो डरना क्या', ऑनर किलिंगविरोधात या सरकारची पोस्टर मोहीम)

शुद्ध आल्यानंतर प्रभूनं तरुणीसह आपलं गाव गाठलं. पण घडल्या प्रकाराचा त्याला जबरदस्त धक्का बसला होता. यातूनच त्यानं आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या प्रकरणाचा तपास करतानाच सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून या सर्वांविरोधात सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पूरग्रस्त अजूनही सावरला नाही अन् भाजपच्या आमदारासह नेते लगावताय ठुमके, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 07:31 AM IST

ताज्या बातम्या