CBIसाठी राजस्थानची दारं बंद, राजकीय वादाला नाट्यमय वळण

Jaipur: Rajasthan Chief Minister Ashok Gehlot addresses a press conference at his residence, in Jaipur, Monday, Dec. 16, 2019. (PTI Photo)(PTI12_16_2019_000183B)

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यावर अतिशय घणाघाती आरोप केलेत. पायलट हे धोकेबाज, बिनकामाचे, टुकार आहेत अशी टीका त्यांनी केली होती.

  • Share this:
    जयपूर 20 जुलै: राजस्थानमधल्या सत्तेच्या राजकीय नाट्याला वेगळं वळण मिळालं आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा निर्णय घेत केंद्राच्या आधीन असलेल्या CBIला राजस्थानची दारं बंद केली आहेत. आता राज्य सरकारच्या परवानगी शिवाय CBIला राज्यात कुठल्याही प्रकारचा तपास करता येणार नाही. सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर अशोक गेहलोत यांची खुर्ची डळमळीत झाली असून या काळात केंद्र सरकार CBIचा वापर करून आपल्याला धक्का देऊ शकते अशी शक्यता वाटल्यानेच गेहलोत यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं आहे. या आधीचा राज्य आणि केंद्र सरकारदरम्यान झालेला करार रद्द करण्यात आला आहे. आता सरकारने नवीन आदेश काढले असून त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार आमने-सामने आलं आहे. राज्याल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाने मागितल्याने राज्य सरकार खडबडून जागं झालं असून त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे. तर राज्यात सचिन पायलट यांनी बंड केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांवर आयकर विभागाने छापेही टाकले होते. त्यावरूनही केंद्र सरकारवर काँग्रेसने टीका केली होती. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यावर अतिशय घणाघाती आरोप केलेत. पायलट हे धोकेबाज, बिनकामाचे, टुकार आहेत अशी टीका त्यांनी केली होती. तर काँग्रेसच्या एका आमदाराने पायलट यांच्यावर भाजपकडून 35 कोटी घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर सचिन पायलट भडकले आहेत. त्यांनी काँग्रेसवर पलटवार करत गंभीर आरोप केला आहे. पायलट म्हणाले, माझी प्रतिमा मलिन करण्यासाठीच हे आरोप करण्यात येत आहेत. मी धोकेबाज असल्याचा काँग्रेसला आज साक्षात्कार झाला का असा सवालही त्यांनी केला. काँग्रेसचे आमदार गिरीराज सिंह मलिंगा यांनी पायलट यांच्यावर 35 कोटी घेतल्याचा आरोप केला होता. त्यावरही त्यांनी कडक भूमिका घेतली. सिंह यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
    Published by:Ajay Kautikwar
    First published: