'प्यार किया तो डरना क्या', ऑनर किलिंगविरोधात या सरकारची पोस्टर मोहीम

'प्यार किया तो डरना क्या', ऑनर किलिंगविरोधात या सरकारची पोस्टर मोहीम

राजस्थानमध्ये ऑनर किलिंगच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी सरकारने एक विधेयक मंजूर केलं आहे. ऑनर किलिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी एक ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे.

  • Share this:

जयपूर, 9 ऑगस्ट : राजस्थानमध्ये ऑनर किलिंगच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी सरकारने एक विधेयक मंजूर केलं आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता पोलीसही सक्रिय झाले आहेत. ऑनर किलिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी एक ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे.

राजस्थानच्या पोलिसांनी मुगल-ए- आजम सिनेमातलं एक दृश्य दाखवून वेगळं पोस्टर तयार केलं आहे. या पोस्टरवर लिहिलं आहे, जब प्यार किया तो डरना क्या? कारण राजस्थान सरकार ऑनर किलिंगच्या विरोधात आहे.

या पोस्टरमध्ये सलीम, अनारकलीच्या व्यक्तिरेखेतल्या दिलीपकुमार आणि मधुबालाचा फोटो आहे. अकबराच्या व्यक्तिरेखेतल्या पृथ्वीराज कपूर यांचाही फोटो आहे.

तुरुंगवास आणि दंड

प्रेम करणं हा काही गुन्हा नाही, असंही राजस्थान पोलिसांनी यावर लिहिलं आहे. प्रेम करणाऱ्यांना जर कोणी इजा पोहोचवली तर त्यांची गय केली जाणार नाही, असाही इशारा यात देण्यात आला आहे. या गुन्ह्यासाठी आजन्म तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

भारत हा ढाण्या वाघ तर पाकिस्तान मांजर, मोदींच्या या मंत्र्यांनी ठणकावलं

प्रेमविवाह केलेल्या जोडप्याला जातीच्या नावाखाली ठार मारणं हा गंभीर गुन्हा आहे हाच संदेश राजस्थान पोलिसांनी या पोस्टरमधून दिला आहे. ऑनर किलिंगच्या कटात जे कुणी सहभागी असतील त्यांनाही हीच शिक्षा होईल, असं सरकारने मंजूर केलेल्या विधेयकात म्हटलं आहे.

'सैराट' या सिनेमामुळे ऑनर किलिंगचं हे दाहक सत्य सगळ्यांसमोर आलं. अशा घटनांना आळा घालण्यासाठी जाणीवजागृती केली जातेय. पण राजस्थान सरकारने मात्र ऑनर किलिंगमध्ये कठोर शिक्षा देणारं विधेयक मंजूर करून मोठं पाऊल उचललं आहे.

=======================================================================================

बुडालेली घरं आणि डोळ्यात पाणी, सांगलीच्या हरी'पूर'चा भीषण VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: August 9, 2019, 6:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading