Alwar Mob Lynching : भाजप ते काँग्रेस; सरकार बदलले आणि पीडितच झाला आरोपी!

Alwar Mob Lynching : भाजप ते काँग्रेस; सरकार बदलले आणि पीडितच झाला आरोपी!

अलवरमध्ये 2017मध्ये झालेल्या गोरक्षकांच्या हल्ल्यात पहलू खान यांचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी आताcharge sheet दाखल करण्यात आली आहे.

  • Share this:

अलवर, 29 जून : राजस्थानमधील अलवर येथे 2017मध्ये झालेल्या Mob Lynchingनं सारा देश हादरून गेला. गोरक्षकांच्या हल्ल्यात यावेळी पहलू खान यांचा मृत्यू झाला. 2017मध्ये राजस्थानमध्ये भाजपचं सरकार होतं आणि वसुंधराराजे शिंदे या मुख्यमंत्रीपदी होत्या. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात गोरक्षकांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पहलू खान यांच्या नावाचा देखील समावेश आहे. 1 एप्रिल 2017 रोजी झालेल्या हल्ल्यात पहलू खान या ट्रक मालकाचा मृत्यू झाला होता. पण, आता राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार सत्तेत असून मृत पहलू खान यांचं नाव आरोपपत्रात आल्यानं टीका होताना दिसत आहे.

काँग्रेसच्या काळात Charg sheet

दोन वर्षापूर्वी झालेल्या हल्ल्याची Charg sheet काँग्रेसच्या काळात दाखल करण्यात आली. 30 डिसेंबर 2018मध्ये ही चार्जशीट तयार करण्यात आली. 29 मे 2019 रोजी ही Charg sheet न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली. यामध्ये पहलू खान आणि त्यांचे दोन मुलं यांच्याविरोधात आरोप करण्यात आले आहेत.

एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप

काय म्हणाला पहलू खान यांचा मुलगा

या आरोपपत्रात पहलू खान यांचा मुलगा इरशादचं नाव देखील आहे. 'गोरक्षकांच्या हल्ल्यात आम्हाला वडिलांना गमवावं लागलं आणि आता आमच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आम्हाला आशा आहे राजस्थानमधील काँग्रेस सरकार यावर विचार करेल. आम्ही अशोक गेहलोत सरकारकडून न्यायाची अपेक्षा केली होती', अशी प्रतिक्रिया इरशादनं Indian Expressशी बोलताना दिली.

दरम्यान, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एक देश, एक रेशन कार्ड; काय आहे केंद्र सरकाची योजना?

भाजपच्या काळात काय झालं?

राजस्थानमध्ये भाजप सरकार सत्तेत असताना देखील अशाच एका प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. पहलू खान यांचे सहकारी अजमत आणि रफिकविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.

तर, अकबरूद्दीन ओवैसी यांनी देखील ट्विटवरून काँग्रेस सरकारवर टीका केली आहे.

VIDEO: भोसरीमध्ये गॅस गळतीमुळे इमारतीत अग्नितांडव!

First published: June 29, 2019, 1:45 PM IST

ताज्या बातम्या