Home /News /national /

10 वर्ष रस्ता बंद, प्रसूती झालेल्या महिलेला खाटेवर झोपवून पायी नेण्याची कुटुंबीयांवर वेळ

10 वर्ष रस्ता बंद, प्रसूती झालेल्या महिलेला खाटेवर झोपवून पायी नेण्याची कुटुंबीयांवर वेळ

ही महिला प्रसुतीनंतर घरी येणार होती. तिच्या घरापासून रस्ता अर्धा किलोमीटर दूर आहे. अखेर दुपारी 4 वाजता कडक उन्हात या महिलेच्या तीन भावांनी मिळून तिला खाटेवर झोपवून घरी परत आणले

    मुंबई, 19 जून : रस्ते चांगले केल्याचे दावे सरकारकडून केले जात असले तरी आजही सामान्य नागरिकांना बसतो.  विशेषत: ग्रामीण भागात हा प्रश्न अधिक गंभीर असून त्याचा त्रास आजारी नागरिक तसेच गर्भवती महिलेला सहन करावा लागतो. अशाच एका सरकारी उपेक्षा सहन करणाऱ्या गावातील कुटुंबाला सरकारी अनास्थेचा फटका बसला. त्यांच्यावर नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलेला कडक उन्हामध्ये खाटेवर झोपवून अर्धा किलोमीटर नेण्याची वेळ आली. मोठ्या कष्टानं त्यांनी या  महिलेला अवघड अवस्थेत घरी आणले. या घटनेतील आणखी संपाजनक बाब म्हणजे प्रसूत झालेल्या महिलेला यापूर्वी देखील या त्रासातून जावं लागलं आहे. ही महिला गर्भवती होती तेव्हा देखील तिला हा सर्व त्रास सहन करावा लागला आहे. राजस्थान (Rajasthan) मधील जलोर जिल्ह्यातील बागोडा राऊता गावातील हा सर्व प्रकार आहे. या गावातील रस्त्याला अतिक्रमणामुळे उपेक्षा सहन करावी लागत होती. प्रसूती झालेली महिला नवजात बाळासह खाटेवर झोपवून घरी परतत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. प्रशासनानं तातडीनं कारवाई करत रस्त्यावरील अतिक्रमण साफ केले. यापूर्वी या गावातील नागरिक हा रस्ता सुरू व्हावा यासाठी सरकार दरबारी फेऱ्या मारत होते. त्यावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. राऊतामधील सावळाराम कुटुंबातील मुलगी प्रसुतीनंतर शुक्रवारी घरी येणार होती. तिच्या घरापासून रस्ता अर्धा किलोमीटर दूर आहे. त्यामुळे त्यांना कोणतंही वाहन मिळालं नाही. अखेर दुपारी 4 वाजता कडक उन्हात या महिलेच्या तीन भावांनी मिळून तिला खाटेवर झोपवून घरी परत आणले. ही महिला गर्भवती होती तेव्हा देखील तिला या मार्गावरून चालत जावे लागत होते. VIDEO: उद्घाटनानंतर बोगद्यामध्ये पडलेल्या कचऱ्यावर गेली पंतप्रधानांची नजर; मग मोदींनी काय केलं पाहा 10 वर्ष रस्ता बंद राऊता गावातील हा  कोणत्याही विरळ वस्तीमध्ये किंवा डोंगराळ प्रदेशात नाही. त्यानंतरही सरकारी अनास्थेमुळे या गावाचा रस्ता 10 वर्ष बंद होता. काही नागरिकांनी परस्पर सहमतीनं जवळपासच्या शेतामधून जाण्यास सुरूवात केली होती. पण, ज्यांना कोणताही उपाय नव्हता ते सर्व जण याच रस्त्याचा उपयोग करत. या महिलेबाबत घडलेल्या घटनेनं प्रशासनाची झोप उडाली आणि त्यांनी हा रस्ता मोकळा केला आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Photo viral, Rajasthan, Viral

    पुढील बातम्या