मराठी बातम्या /बातम्या /देश /

उन्हात पायपीट, तहानेनं व्याकूळ 5 वर्षीय चिमुरडीचा अंत, पावसाच्या थेंबांमुळं वाचली आजी

उन्हात पायपीट, तहानेनं व्याकूळ 5 वर्षीय चिमुरडीचा अंत, पावसाच्या थेंबांमुळं वाचली आजी

Rajasthan heat death हलका पाऊस सुरू झाला. त्यामुळं महिलेला काहीसा दिलासा मिळाला आणि तिच्या जीवात जीव आला. पण तोपर्यंत तिच्या नातीचा मृत्यू झालेला होता.

  • Published by:  News18 Desk
जालोर(राजस्थान), 8 जून : कडाक्याच्या उन्हामध्ये (Hot Summer) आजीबरोबर पायी जाणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीचा (5 year old girl) पाणी मिळालं नाही म्हणून दुर्दैवी अंत झाला. ही घटना रविवारी (Sunday) घडली. राजस्थानच्या जालोरमधील (Rajasthan Jalor) डुंगरी येथील वृद्ध महिला सुखीदेवी या त्यांच्या नातीसह रायपूरला गेल्या होत्या. रविवारी सकाळी वातावरण थंड असल्याचं पाहून त्या नातीसह पायीच निघाल्या. दहा बारा किलोमीटर चालल्यानंतर उन्हाचा कडाका वाढला. त्यामुळं चिमुरड्या दोहितीला प्राण गमवावा लागला. (वाचा-डॉक्टरांवर सामुहिक अत्याचाराचा आरोप, मृत्यूपूर्वी पीडितेचा चिठ्ठी लिहून खुलासा) या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार या महिलेनं सोबत पाणी ठेवलं नव्हतं. तसंच ज्या मार्गावरून ती जात होती, तो वाळूचा कच्चा रस्ता होता. कडक ऊन आणि पाणी न मिळाल्यानं चिमुरडीचा पाण्यासाठी व्याकूळ होत मृत्यू झाला. दोघी बेशुद्ध होऊन पडल्या होत्या. काही वेळानं कोणीतरी पाहिलं तर सूरजवाडा येथील सरपंचांना फोनवर माहिती दिली. नंतर पोलिस याठिकाणी पोहोचले पण तोपर्यंत चिमुकलीचा अंत ढाला होता. वृद्ध महिलेला पोलिसांनी पाणी पाजलं आणि नंतर रुग्णालयात दाखल केलं. (वाचा-बहिरं बनवतोय कोरोनाव्हायरस; नाक, जिभेनंतर आता कानांवरही गंभीर दुष्परिणाम) वृद्ध महिलेनं सांगितलं की, कडाक्याच्या गर्मीमुळं दोघी बेशुद्ध होऊन पडल्या होत्या. तिला काय करावं हे काहीही सुचत नव्हतं. पम काही वेळानं हलका पाऊस सुरू झाला. त्यामुळं महिलेला काहीसा दिलासा मिळाला आणि तिच्या जीवात जीव आला. पण तोपर्यंत तिच्या नातीचा मृत्यू झालेला होता. या वृद्ध महिलेची मानसिक स्थिती फारशी चांगली नसल्याचंही सांगितलं जात आहे. ती माहेरी नातेवाईकांना भेटायला नातीला सोबत घेऊन गेली होती. थंड वातावरण असल्याचा अंदाज लावत चिमुरडीला पायपीट करत ती घरी परत आणत होती. सोबत पाणीही नव्हतं, त्यामुळं पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या चिमुकलीचा जीव गेला.
First published:

Tags: Rajasthan, Summer hot

पुढील बातम्या