Home /News /national /

लग्न सोहळ्याचा आनंद क्षणीक ठरला! भररस्त्यात काळानं गाठलं अन् तिघांचा मृत्यू झाला

लग्न सोहळ्याचा आनंद क्षणीक ठरला! भररस्त्यात काळानं गाठलं अन् तिघांचा मृत्यू झाला

भरधाव वेगात असलेली कार रस्त्यावरच्या सिमेंट ब्लॉकवर धडकली आणि तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

    नागौर, 27 नोव्हेंबर : लखनऊ, जेतपूर नंतर आणखीन एक भीषण अपघात समोर आला आहे. लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमाहून घरी परतणाऱ्या कुटुंबीयावर काळानं घाला घातला. भरधाव वेगात असलेली कार रस्त्यावरच्या सिमेंट ब्लॉकवर धडकली आणि तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. लग्न सोहळ्यावरून घरी परत जात असताना भररस्त्यात मृत्यूनं गाठल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या नागौर इथल्या सिंघाडे परिसराजवळची असल्याचं सांगितलं जात आहे. भरधाव कार रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या ब्लॉकवर धडकली आणि हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघता इतका भयंकर होत की कार उलटी होऊन एका बाजूनं वर उचलली गेल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. या कारमध्ये असलेल्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे वाचा-भरधाव कारनं 3 जणांना चिरडलं, पाहा भीषण अपघाताचा LIVE VIDEO अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले असून स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर रस्त्यावरून कार हटवण्यात आली आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती मिळाली आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जोधपूरमधून एक कुटुंबीय लग्न सोहळ्याचा कार्यक्रमासाठी मुंडवा इथे थांबले होते. मुंडवा इथून पुन्हा घरी जात असताना हा भीषण अपघता घडल्याची माहिती मिळाली आहे. कार चालकासमोर गाय आल्यामुळे त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार ब्लॉकवर जाऊन धडकली त्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Rajasthan

    पुढील बातम्या