सोनिया गांधींच्या तपासणीची मागणी करणाऱ्या खासदारालाच झाली Corona ची लागण; आता तो जुना VIDEO होतोय व्हायरल

सोनिया गांधींच्या तपासणीची मागणी करणाऱ्या खासदारालाच झाली Corona ची लागण; आता तो जुना VIDEO होतोय व्हायरल

राजस्थानच्या या खासदाराने मार्चमध्ये सोनिया गांधींविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा हा VIDEO आता व्हायरल होतो आहे.

  • Share this:

नागौर (राजस्थान), 29 जुलै : भारतात इटलीहूनच Coronavirus येत आहे. त्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची तपासणी केली जावी.  अशी चार महिन्यांपूर्वी मागणी लोकसभेत करणारे राजस्थानमधले खासदार हनुमान बेनिवाल यांनाच Coronavirus ची लागण झाली आहे.

राजस्थानातल्या लोकतांत्रिक पार्टीचे नागौर इथले खासदार हनुमान बेनिवाल यांनी स्वतःच आपल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचं म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या Tweet मध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.

Coronavirus च्या साथीच्या सुरुवातीच्या काळात भारतात या विषाणूचा प्रसार फारसा झालेला नव्हता त्या वेळी बेनिवाल यांनी संसदेत एक अजब मागणी केली होती. इटलीत कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणावर प्रभावशाली आहे. भारतात इटलीतूनच येणारा कोरोना विषाणू अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे इटलीहून आलेल्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची तपासणी केली जावी. म्हणजे त्यांना लागण झालेली नाही ना हे स्पष्ट होईल, असं वक्तव्य त्यांनी बर लोकसभेत केलं होतं. मार्चमध्ये सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनातली त्यांची ही क्लिप तेव्हा वादग्रस्त ठरली होती. त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याला संसदीय कामकाजातून वगळण्यात यावं असाही प्रस्ताव होता.

आता स्वतः बेनिवाल यांनाच विषाणूची लागण झाली आहे. गेल्या 10 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी सोशल मीडियावरून केलं आहे.

हनुमान बेनिवाल यांची पत्नी कनिका यांची Covid चाचणी निगेटिव्ह आली आहे. मार्चमध्ये लोकसभेच्या अधिवेशनात त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याबद्दल कोरोनाव्हायरसवरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 29, 2020, 6:04 PM IST

ताज्या बातम्या