पुन्हा एकदा गो- तस्करीच्या संशयातून मुस्लिम तरुणाचा बळी

पुन्हा एकदा गो- तस्करीच्या संशयातून मुस्लिम तरुणाचा बळी

गायींना रस्त्यावरून नेत असताना जमावाने दोन व्यक्तींना थांबवले

  • Share this:

राजस्थान, २१ जुलैः मॉब लिचिंगविरोधात कठोर कायदा करण्याचे आदेश सुप्रीम हायकोर्टाने राज्यसरकारला दिले असताना गो- तस्करीप्रकरणात पुन्हा एकदा जमावाने मुस्लिम तरुणाची निर्घृण हत्या केली. राजस्थानमधल्या अलवर जिल्ह्यातील रामगड येथे जमावाने गो- तस्करीचा संशय घेऊन अकबर खान या तरुणाची हत्या केली. अकबर मुळचा हरियाणाचा राहणारा होता. गायींना रस्त्यावरून नेत असताना जमावाने दोन व्यक्तींना थांबवले. ते गायीची तस्करी करत असल्याचा संशय जमावाला आला. या संशयावरून जमावाने दोघांची बेदम मारहाण केली. यात अकबर खानचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. सध्या अकबरचं पार्थिव अलवरमधल्या सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आलं असून, या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. जमावामधल्या गुन्हेगारांचा शोध घेण्याचं काम सुरू असून, ते दोघं गो- तस्करी करत होते की नाही याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरयानामधील कोलगाव येथून दोघंही गायी घेऊन रामगडला आले होते.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी गुन्हेगारांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना शिक्षा करण्यात येईल, असे अलवरचे सहपोलिस अधीक्षक अनिल बेनीवाल यांनी सांगितलं. अलवरचे खासदार करण सिंह यादव यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. याआधीही गेल्यावर्षी अलवरमध्ये ५५ वर्षीय पहलू खान यांची जमावाने हत्या केली होती. या घटनेनंतर देशभरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. आता त्याच अलवरमध्ये दुसरी घटना घडली. याविरोधात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसे यांनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, राज्यघटनेनुसार गाईला जगण्याचा नैतिक अधिकार आहे आणि पण एका मुस्लिम व्यक्तिला मारलं जात कारण त्याला जगण्याचा नैतिक अधिकार नाही. मोदी सरकारची चार वर्ष.

हेही वाचाः

नरेंद्र मोदींवरच्या अ'विश्वासा'वरून शिवसेनेत गोंधळ 

या सरकारच्या हातून काहीच होणार नाही-राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

पंतप्रधानपदाची आब राखा, सुमित्रा महाजन यांची राहुल गांधींना समज

शाळेत विद्यार्थिनीवर 18 जणांचा सामूहिक बलात्कार,शिक्षकही झाले सहभागी 

First published: July 21, 2018, 1:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading