विधानसभा निवडणुकीत 20 हजार कोटींचा सट्टा, भाजपच्या पराभवाचे संकेत!

या निवडणुकांवर तब्बल 20 हजार कोटींचा सट्टा लागल्याचा अंदाज असून मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये सत्ताबदल होऊ शकतो असे संकेत या बाजाराने दिले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 26, 2018 10:38 PM IST

विधानसभा निवडणुकीत 20 हजार कोटींचा सट्टा, भाजपच्या पराभवाचे संकेत!

इंदूर, 26 नोव्हेंबर : मध्यप्रदेश आणि राजस्थानमधल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपलाय. 28 नोव्हेंबरला तिथे मतदान होणार आहे. ही निवडणुक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. असं असताना सट्टाबाजाराचे आलेले अंदाज भाजपची चिंता वाढविणारे आहेत. या निवडणुकांवर तब्बल 20 हजार कोटींचा सट्टा लागल्याचा अंदाज असून मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये सत्ताबदल होऊ शकतो असे संकेत या बाजाराने दिले आहेत.

प्रत्येक निवडणुकीत सट्टाबाजाराला वेगळं महत्व असतं. या बाजारातून आलेल्या अंदाजाची राजकीय क्षेत्रातही दखल घेतली जाते. ज्यापक्षाला जिंकण्याची संधी असते त्याचा भाव हा कमी असतो. तर ज्या पक्षाच्या पराभवाची शक्यता असते त्याचा भाव हा जास्त असतो.

मध्यप्रदेश आणि राजस्थानात सट्टाबाजाराने काँग्रेसला कौल दिलाय. तर छत्तिसगडमध्ये भाजप निसटता विजय मिळवेल असा या बाजाराचा अंदाज आहे. सट्टा बाजारातल्या अंदाजानुसार मध्यप्रदेशात एकूण 230 जागांपैकी काँग्रेसला 114-116 जागा तर भाजपला 101-103 जागांवर विजय मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

तर राजस्थानमध्ये एकूण 200 जागांपैकी काँग्रेसला 127- 129 तर भाजपला 54-56 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर छत्तिसगडमध्ये एकूण 90 जागांपैकी भाजपला 43-45 तर काँग्रेसला 38-40 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

प्रत्येक जागांसाठी, विभागांसाठी राज्यांमधल्या एकूण जागांसाठी, राज्यात कुणाचं सरकार येणार, मुख्यमंत्री कोण होणार अशा अनेक गोष्टींसाठी सट्टा लावण्यात येतो. हजारो कोटी रूपये यात गुंतवले जातात.

Loading...

मध्यप्रदेश आणि छत्तिसगडमध्ये गेली 15 वर्ष भाजपचं सरकार आहे.

तर राजस्थानमध्ये दरवर्षी लोक नव्या पक्षाला संधी देतात हा इतिहास आहे. तिथे सलग दोन वेळा आत्तापर्यंत कुठलाच पक्ष निवडून आला नाही असा तिथला इतिहास आहे. त्यामुळं यावेळी नेमकं काय होतं हे 11 डिसेंबरच्या निकालानंतर जाहीर होणार आहे.


 


Videos : राहुल गांधींना टक्कर देत आता अमित शहांनी देखील गाठली 'खाऊगल्ली'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 09:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...