मराठी बातम्या /बातम्या /देश /

5 मुलींसह विहिरीत उडी घेऊन आईनं संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण; पती म्हणतो...

5 मुलींसह विहिरीत उडी घेऊन आईनं संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण; पती म्हणतो...

(Photo Credit- tv9hindi)

(Photo Credit- tv9hindi)

महिलेनं आपल्या 5 मुलींसह विहिरीत उडी (Jumping Into A Well)घेऊन जीवन संपवलं आहे. या घटनेत सर्वांचा मृत्यू झाला.

  • Published by:  Pooja Vichare

राजस्थान, 05 डिसेंबर:  कोटा (Kota) येथून रविवारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलेनं आपल्या 5 मुलींसह विहिरीत उडी (Jumping Into A Well)घेऊन जीवन संपवलं आहे. या घटनेत सर्वांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी विहिरीतून 6 मृतदेह बाहेर काढले. असं सांगितलं जात आहे की, महिलेचं रोज तिच्या पतीसोबत भांडण व्हायचं. त्यामुळेच तिनं हे पाऊल उचललं. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेला.

प्रकरण कोटा येथील रामगंजमंडी भागातील चेचट पोलीस ठाण्याच्या कालियाखेडी (मदनपुरा ग्रामपंचायत) गावचं आहे. येथे शिवलाल पत्नी बादाम देवी (40) आणि सात मुलींसोबत राहत होता. पतीसोबतच्या रोजच्या भांडणाला कंटाळून पत्नी बादाम देवी यांनी आपल्या पाच मुली सावित्री (वय 14 वर्षे), अंजली (8 वर्ष), काजल (वय 6 ), गुंजन (वय 4) आणि अर्चना (1 वर्ष) यांना घेऊन विहिरीत उडी घेतली. रविवारी सकाळी ग्रामस्थांनी सर्वांचे मृतदेह बाहेर काढले.

दोन मुली होत्या घराबाहेर, त्यांचा वाचला जीव

आता कुटुंबात फक्त गायत्री (14) आणि पूनम (7) हयात आहेत. घटनेच्या वेळी दोन्ही मुली घराबाहेर होत्या, त्यामुळे त्या वाचल्या असण्याची शक्यता आहे. अन्यथा ती महिला त्यांना सोबत घेऊन जाऊ शकली असती.

पती म्हणाला- मी घराबाहेर होतो

या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण होत आहेत. पती-पत्नीमध्ये रोज भांडणे होत असल्याची चर्चा आहे. परस्पर वादामुळे महिलेने आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे. त्याचवेळी मृत महिलेचा पती शिवलाल यानं आपण शनिवारी दुपारी 12 वाजता घराबाहेर पडल्याचं सांगितलं. शिवालाल संध्याकाळपर्यंत परत आला नव्हता. त्यातच रात्री पत्नीनं आत्महत्येसारखे पाऊल उचललं.

हेही वाचा- 12 लाखांचा दरोडा टाकणारा 'भूत' अटकेत; झाला धक्कादायक खुलासा

रामगंज मंडीचे डेप्युटी एसपी प्रवीण नायक म्हणाले की, ही अत्यंत दुःखद घटना आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सर्व 6 मृतदेहांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे. प्राथमिक तपासात पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच कारण शोधलं जात आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर घटनेचे चित्र स्पष्ट होईल. मृतकाचा पती आणि शेजाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

First published:

Tags: Rajasthan