Home /News /national /

देश पुन्हा हादरला! खाप पंचायतीने महिलेला गावासमोर विवस्त्र करण्याची सुनावली शिक्षा

देश पुन्हा हादरला! खाप पंचायतीने महिलेला गावासमोर विवस्त्र करण्याची सुनावली शिक्षा

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

महिलेला गावासमोर विवस्त्र करीत आंघोळ करण्याची शिक्षा सुनावण्यात आली. यावेळी अनेकजण महिलेचा व्हिडीओ शूट करीत होते

    सीकर, 2 सप्टेंबर : राजस्थानातील शेखावाटी भागात एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. येथील खाप पंचायतीने (Khap Panchayat) सर्व सीमा पार करीत एका महिलेवर आपल्याच कुटुंबातील एका तरुणासोबत अवैध संबंध असल्याचा (Illegal relation) आरोप लावला आहे. यावेळी पंचायतीने तिला दिलेली शिक्षा माणुसकीला काळीमा फासणारी आहे. खास पंचायतीवर आरोप आहे की त्यांनी महिलेला निर्वस्त्र (Nude) करीत तिला सार्वजनिकरित्या शेकडो लोकांसमोर आंघोळ घातली. 21 ऑगस्ट रोजी झालेल्या या घटनेनंतर मंगळवारी सांसी समाजाने पोलीस अधीक्षकांना आरोपींविरोधाक कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे ही वाचा-मुंबईत इंटरनॅशनल कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश, मुख्य आरोपीस ठोकल्या बेड्या अखिल राजस्थान सासी समजाचे सुधारक आणि विकास न्याय प्रदेश अध्यक्ष सवाई सिंह मालावत यांनी सोमवारी सासी समाजातील लोकांसह पोलीस अधीक्षकांकडे याबाबतची तक्रार नोंदवली. याबाबत सांगितले जात आहे की, ही घटना 21 ऑगस्ट रोजी राजस्थानातील सोला गावात झाली. येथे सासी समाजातील एक महिला आणि दीराच्या मुलाला सार्वजनिकरित्या आंघोळ घालण्यात आली. खाप पंचायतीने महिलेवर आरोप लावला आहे की, तिचे कुटुंबातील तरुणासोबत अवैध संबंध आहेत. यादरम्यान 400 लोक जमा होते. मात्र कोणीच याचा विरोध केला नाही. यादरम्यान नग्न अवस्थेत महिलेचे फोटो काढण्यात आले आणि व्हिडीओही बनविण्यात आला. 51000 चा आर्थिक दंड लावला खाप पंचायतीने महिला आणि त्याच्या भाच्याविरोधात 51000 रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. समाजाने पोलिसांकडे मागणी केली आहे की, गुन्हा दाखल करीत आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. खाप पंचायतीत जे लोक सहभागी होते, त्यांच्याकडून 51 हजार रुपया घेऊन पीडित महिलेला परत केले जावे, अशी मागणी केली आहे. याशिवाय तेथे उपस्थित असलेल्या लोकांविरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी केली जात आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Women harasment

    पुढील बातम्या