• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • धक्कादायक! 'या' IIT कॉलेजमधील 25 विद्यार्थी आणि शिक्षक Corona Positive

धक्कादायक! 'या' IIT कॉलेजमधील 25 विद्यार्थी आणि शिक्षक Corona Positive

जोधपूर आयआयटी (IIT) कॉलेजमधील 25 विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या बातमीनं आयआयटीमध्ये खळबळ उडाली आहे.

 • Share this:
  जोधपूर, 31 मार्च : राजस्थानमधील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असणाऱ्या जोधपूर (Jodhpur) मध्ये कोरोना (COVID-19) रुग्णांची  संख्या सातत्याने वाढत आहे. मंगळवारी राज्यातील सर्वात जास्त कोरोना पेशंट्सची नोंद जोधपूरमध्येच झाली आहे. जोधपूर आयआयटी (IIT) कॉलेजमधील 25 विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या बातमीनं आयआयटीमध्ये खळबळ उडाली आहे.  25 जण पॉझिटीव्ह आढळल्याचं उघड होताच प्रशासनाने हा परिसर कटेंनमेंट झोन (Containment Zone) जाहीर केला आहे. जोधपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार शहरात 520 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये तब्बल 141 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या आकडेवारीवरुन शहरातील कोरोनाच्या वाढत्या स्पीडचा अंदाज येऊ शकेल. शहरातील कोरोना संक्रमण दर पुन्हा एकदा 27 टक्के झाला आहे. आयआयटीमधील 25 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्या परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. आयआयटी ब्लॉक जी 3 मधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक आता त्यांच्या फ्लॅटमध्येच राहतील. तसंच त्यांना पूर्वपरवानगीशिवाय  बाहेर पडता येणार नाही. आयआयटी परिसरात बनवण्यात आलेले सुपर आयसोलेशन सेंटर देखील कंटेनमेंट झोनमध्येच आहे. जोधपूरमधील प्रत्येक भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात एकूण 9 झोन आहेत. तर ग्रामीण भागात 38 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. होळीच्या दिवशी दिवसभरात 214 जणांना कोरोनाची लागण झाली. जोधपूरमध्ये गेल्या 3 दिवसात 455 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. ( वाचा : Coronavirus : संपूर्ण देश संकटात, केंद्रानं महाराष्ट्रासह 10 राज्यांना पत्र लिहून दिला गंभीर इशारा ) जोधपूरमध्ये मार्च महिन्यात आतापर्यंत 1456 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जानेवारी महिन्यात हा आकडा 967, तर फेब्रुवारीमध्ये  375 होता. मार्च महिन्यात कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या ही डिस्चार्ज झालेल्या एकूण रुग्णांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. जोधपूरमध्ये मागील वर्षभरात  934 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: