Home /News /national /

भीषण! बसमध्ये करंट लागून सहा जणांचा होरपळून मृत्यू

भीषण! बसमध्ये करंट लागून सहा जणांचा होरपळून मृत्यू

प्रवाशांनी (Passenger) भरलेली बस विजेच्या तारांमध्ये (electric wire) अडकली. बसमधील प्रवाशांना काही समजण्याच्या आतच संपूर्ण बसमध्ये आग पसरली. दुर्दैवी यात्रेककरुंना बस बाहेर पडण्याची देखील संधी मिळाली नाही.

    जालोर, (राजस्थान) 17 जानेवारी : प्रवाशांनी (Passenger) भरलेली बस विजेच्या तारांमध्ये (electric wire) अडकली. त्यांना काही समजण्याच्या आतच  संपूर्ण बसमध्ये आग पसरली. दुर्दैवी यात्रेककरुंना बस बाहेर पडण्याची देखील संधी देखील मिळाली नाही. या भीषण अपघातामध्ये सहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी आहेत. राजस्थान (Rajasthan) मधील जालोरमध्ये हा भयंकर अपघात झाला. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखळ झाली आहे. या अपघातामधील सर्व जखमींना जोधपूरच्या (Jodhpur) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कसा झाला अपघात? या अपघाताबद्दल मिळालेल्या माहितीनुसार,  ही प्रवासी बस रस्ता चुकल्यानं एका गावात गेली होती. या गावात विजेच्या तारा लटकत असलेल्या पाहून बस ड्रायव्हरनं बस थांबवली. त्यानंतर बसमधील एक कर्मचारी टपावर गेला आणि त्यानं काठीच्या मदतीनं विजेच्या तारा वर उचलण्याचा प्रयत्न करु लागला. याचवेळी त्या काठीमधून करंट त्या कर्मचाऱ्याच्या शरिरात आला. त्यामुळे तो कर्मचारी जागेवरच पेटला आणि त्याचबरोबर बसही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. बस कडंक्टर आणि ड्रायव्हरचा मृत्यू या अपघातामधील मृतदेहांना बसच्या बाहेर काढण्यात आलं आहे. मृतांमध्ये बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टरचा समावेश आहे. अन्य मृतांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. या अपघातामधील मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रस्ते अपघातांचं प्रमाण वाढलं राजस्थानात रस्ते अपघातांचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. जोधाणामध्ये 14 जानेवारी रोजी तेलाचा टँकर आणि ट्रेलर यांच्यात जोरदार धडक झाली होती. या अपघातामध्ये तेलाच्या टँकरला आग लागली. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade)  अर्धा डझन गाड्यांच्या मदतीनं मोठ्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आली. या अपघातामुळे बारमेर-जोधपूर रस्ता जाम झाला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rajsthan, Road accident

    पुढील बातम्या