राजस्थान भाजपचे अध्यक्ष मदन लाल सैनी यांचं निधन

राजस्थान भाजपचे अध्यक्ष मदन लाल सैनी यांचं निधन

मदनलाल सैनी हे 1952 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जोडले गेले होते. भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही त्यांनी विविध पदांवर काम केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जून :  राजस्थान भाजपचे अध्यक्ष मदन लाल सैनी यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. सैनी हे भाजपचे राज्यसभेचे खासदार होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिल्लीतल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलंय.

काही दिवसांपूर्वीच राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा, संरक्षमंत्री राजनाथ सिंग यांनी 'एम्स'मध्ये जाऊन सैनी यांना श्रद्धांजली अर्पण केली. राजस्थानातल्या त्यांच्या मुळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मदनलाल सैनी हे 1952 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जोडले गेले होते. भारतीय मजदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही त्यांनी विविध पदांवर काम केलं. उदयपुरवाटी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडणुनही गेले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rajasthan
First Published: Jun 24, 2019 10:05 PM IST

ताज्या बातम्या