Home /News /national /

सैतानी साधू! गर्भवती महिलेवर बलात्कार, तपासात सापडलं कंडोम आणि अश्लील व्हिडीओनं भरलेली हार्ड डिस्क

सैतानी साधू! गर्भवती महिलेवर बलात्कार, तपासात सापडलं कंडोम आणि अश्लील व्हिडीओनं भरलेली हार्ड डिस्क

पोलिसांना या साधूच्या घरात एक मोठी बॅग सापडली. बॅग उघडल्यावर पोलीस हादरले.

    नवी दिल्ली, 14 जून : राजस्थानच्या करौली जिल्ह्यात एका गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका जैन साधूला अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या साधूकडून पोलिसांनी 33 पेन ड्राईव्ह, कंडोम पॅकेट आणि दोन लॅपटॉप जप्त केले आहेत. जप्त केलेल्या वस्तू पोलिसांना आरोपी राहत असलेल्या सामुदायिक आश्रय निवासात एका मोठ्या बॅगमध्ये सापडल्या. एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीविरूद्ध पुरावे गोळा करण्यासाठी जयपूर येथील फॉरेन्सिक टीम करौली इथं पाठवण्यात आली होती. तपासणा दरम्यान, पोलिसांना या साधूच्या घरात एक मोठी बॅग सापडली. बॅग उघडल्यावर पोलीस हादरले. या बॅगमध्ये तब्बल 19 मोबाइल फोन, दोन लॅपटॉप, चार हार्ड डिस्क, कंडोम पॅकेट्स आणि 33 पेन ड्राईव्ह होत्या. दरम्यान पोलिसांनी मिळालेली हार्ड डिस्क स्कॅन केल्यानंतर यात त्यांना अश्लील व्हिडीओ आढळून आले. वाचा-भीषण अपघात! कार-दुचाकीची समोरासमोर धडक, वनरक्षकाचा जागेवरच मृत्यू धमकी देऊन करायचा बलात्कार 38 वर्षीय जैन साधूनं एका गर्भवती महिलेवर बलात्कार केला, जी आपल्या मोठे जावेबरोबर आशीर्वाद घेण्यासाठी या साधूकडे आली होती. सुरुवातीला पीडित महिलेची वहिनी आत घेतली, या साधूनं तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला पण ती लगेच बाहेर आली. यानंतर जेव्हा पीडित महिला खोलीत गेली तेव्हा या साधूनं तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, याआधीही महिलांना धमक्या देऊन त्यांच्यावर या साधूनं बलात्कार केल्याचं बोललं जात आहे. वाचा-बँकेच्या अधिकाऱ्याने निवडला शेती करण्याचा मार्ग, विहिरीची अशी केली पूजा की... साधूविरुद्ध गुन्हा दाखल घरी परत आल्यानंतर पीडित महिलेने झालेला प्रकार आपल्या नवऱ्याला सांगितला. कुटुंबियांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. भारतीय दंड संहिताच्या (IPC) कलम 376 (बलात्कार) आणि 354 (महिलेचा विनयभंग) अंतर्गत या साधूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. वाचा-अंत्यसंस्कारानंतर आला मृताचा रिपोर्ट, 19 जणं कोरोना पॉझिटिव्ह; 350 क्वारंटाईन
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या