धक्कादायक...मुलीला होती 10 वर्षांपासून केस खाण्याची सवय, पोटात निघाला 600 ग्रॅम झुपका!

धक्कादायक...मुलीला होती 10 वर्षांपासून केस खाण्याची सवय, पोटात निघाला 600 ग्रॅम झुपका!

मुलीला स्वत:चेच केस खाण्याची सवय होती. गेल्या 10 वर्षांपासून तीला ही वाईट सवय जडली होती. सुरूवातीला ते तिला कळलं नाही. मात्र नंतर त्या सवयीचं व्यसनात रुपांतर केव्हा झाला हे त्या मुलीला कळलंच नाही.

  • Share this:

हनुमानगढ 07 ऑक्टोंबर : राजस्थानमधल्या हनुमानगढमध्ये डॉक्टरांनी एक अवघड ऑपरेशन यशस्वी केलंय. हे ऑपरेशन काय होतं हे तुम्ही वाचलं तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. इथल्या Mahatma Gandhi Government Hospitalमधल्या डॉक्टरांच्या पथकालाही हा अनोखा पेशंट पाहुन आश्चर्याचा धक्काच बसला. डॉक्टरांनी ऑपरेशननंतर जे काही पाहिलं त्यानंतर त्यांचा स्वत:वर विश्वासच बसला नाही. डॉक्टरांनी मुलीच्या (Girl) पोटातून तब्बल 600 ग्रॅम केसांचा (Hair)  झुपका काढला. असा पेशंट आपल्याला  पहिल्यांदाच भेटला अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी व्यक्त केलीय. गेल्या 10 वर्षांमध्ये या मुलीच्या पोटात हे केस गोळा झाले होते. हनुमानगढ इथली ही 18 वर्षीय मुलगी असून तीला स्वत:चेच केस खाण्याची सवय होती. गेल्या 10 वर्षांपासून तीला ही वाईट सवय जडली होती. सुरूवातीला ते तिला कळलं नाही. मात्र नंतर त्या सवयीचं व्यसनात रुपांतर केव्हा झाला हे त्या मुलीला कळलंच नाही.

...तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, PMC बँक घोटाळ्यात नेत्यांना घरांची भेट

काही केस खाल्ल्याशीवाय तीला चैनच पडत नसे. सुरूवातीला त्याचा काही त्रास झाला नाही. मात्र जस जशी वर्ष वाढत गेली तस तसं तिला जास्त त्रास होत गेला. शेवटी असह्य झाल्याने तीला दवाखान्यात भरती करण्यात आलं. डॉक्टरांनी जेव्हा एक्स रे काढला तेव्हा त्यांना पोटात काहीतरी केसासारखं असल्याचं दिसलं. त्यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने जेव्हा ऑपरेशन केलं तेव्हा त्यांना पोटात जे काही आढळलं त्यामुळे ते थक्कच झाले.

आई आमदार व्हावी म्हणून मुलाने घेतली रिंगणातून माघार!

त्या मुलीच्या पोटात 600 ग्रॅम केसांचा झुपका आढळला. गेल्या 10 वर्षात हे केस त्या मुलीच्या पोटात जमा झाले होते. एवढे केस असताना ती मुलगी जिंवतच कशी राहिली याचंही डॉक्टरांना आश्चर्य वाटलं. कारण केसांमुळे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे इतर अनेक आजारही होऊ शकतात. असे आजार जिवावर बेतू शकतात अशी शक्यताही डॉक्टरांनी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2019 09:22 PM IST

ताज्या बातम्या