राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम; उद्या दिल्लीत निर्णय होणार

सचिन पायलट आणि अशोक गहलोत या काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रचंड स्पर्धा सुरू आहे. आता राजस्थान काँग्रेसने याबाबतचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे सोपवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 12, 2018 08:50 PM IST

राजस्थानच्या  मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम; उद्या दिल्लीत निर्णय होणार

जयपूर, 12 डिसेंबर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असला तरीही अजून मुख्यमंत्रिपदाबाबतचा सस्पेन्स कायम आहे. थोड्याच वेळात राहुल गांधी यावर निर्णय घेणं अपेक्षित होतं, पण दोन्ही नेत्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राज्याचं नेतृत्व कोण करणार याबाबत एकमत होऊ शकलेलं नाही. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये सचिन पायलट आणि अशोक गहलोत दोघेही होते. त्यानंतर राजभवनकडे नेते रवाना झाले.  उद्या सकाळी 9 वाजता खासगी विमानानं हे सगळे नेते दिल्लीला जाणार आहे. अंतिम निर्णय उद्या दिल्लीतच राहुल गांधी घेतील, असं सांगण्यात येतंय.


पर्यवेक्षक म्हणून वेणुगोपाल आधीच दिल्लीला पोहोचून राहुल गांधी यांना रिपोर्ट देणार आहेत. कारण सचिन पायलट आणि अशोक गहलोत या काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रचंड स्पर्धा सुरू आहे.

मुख्यमंत्रीपदाबाबत राहुल गांधींनी निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव काही वेळापूर्वी झालेल्या आमदारांच्या बैठकीत अशोक गहलोत यांनी मांडला. या प्रस्तावाला सचिन पायलट यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता राजस्थानच्या सत्ता सिंहासनावर कोण बसणार, यावर राहुल गांधी मोहर उमटवतील.

दरम्यान, 'राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार, हे राहुल गांधींनाच विचारा,' अशी प्रतिक्रिया मंगळवारी काँग्रेसचे राजस्थानातील मोठे नेते अशोक गहलोत यांनी दिली होती. राजस्थानात काँग्रेस सत्ता स्थापण करणार, असं चित्र आहे. यावर अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं होतं.

Loading...

राजस्थानात काँग्रेसने 100 जागांवर बाजी मारली आहे तर भाजपला 73 जागांवर यश आलं आहे. काँग्रेसकडून अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागांपैकी 199 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान झालं. यावेळी 72 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. रामगड या विधानसभा मतदारसंघातील बसपा उमेदवाराचा मृत्यू झाल्याने या मतदारसंघातील मतदान पुढे ढकललं आहे. 2013 साली झालेल्या मागील निवडणुकीत भाजपने 163 जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर काँग्रेसला अवघ्या 21 जागा मिळवता आल्या होत्या. इतरांना 16 जागांवर यश आलं होतं.


VIDEO : नेत्यांची होणार राष्ट्रवादीत घरवापसी, अजित पवारांचा मोठा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2018 02:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...