अखेर राजस्थानला मिळाले नवे मुख्यमंत्री, राहुल गांधींनी घेतला हा निर्णय

अखेर राजस्थानला मिळाले नवे मुख्यमंत्री, राहुल गांधींनी घेतला हा निर्णय

राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांची नाराजी दूर करत मधला मार्ग स्वीकारला.

  • Share this:

14 डिसेंबर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण होणार या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळालाआहे. तीन दिवसांच्या बैठकानंतर अखेर अशोक गहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. तर सचिन पायलट हे उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांना भेटायला बोलावलं होतं. दोन्ही नेत्यांनी मर्जी लक्षात घेता अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रिपद तर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला.

अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नावाची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत अशोक गहलोत हे मुख्यमंत्री असणार आहे तर सचिन पायलट हे उपमुख्यमंत्री असणार आहे असं जाहीर केलं. या घोषणेनंतर अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले.

यावेळी गहलोत यांनी वसुंधरा राजे यांच्यावर टीका केली. वसुंधरा राजे यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. त्यामुळे जनतेनं त्यांना घरी बसवलं. जनतेनं आम्हाला संधी दिली त्यांच्या विश्वासला तडा जाऊ देणार नाही असं गहलोत म्हणाले.

तर सचिन पायलट यांनीही राहुल गांधी यांचं आभार मानले. राजस्थानच्या जनतेनं आम्हाला भरभरून मतदान केलं. काही जण हे भाजपला जास्त जागा मिळतील असं सांगत होते पण जनतेनं ते साफ खोटं ठरवलं. जनतेनं काँग्रेसला निवडून दिलं. त्यामुळे आम्ही राज्याच्या विकासासाठी प्रथम प्राधान्य देऊन काम करू असं आश्वासन सचिन पायलट यांनी दिलं.

राजस्थानमध्ये 99 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. परंतु, बहुमताचा आकडा काँग्रेसला अवघ्या दोन जागांनी गाठता आला नाही. पण अपक्ष आणि बसपाने काँग्रेसला पाठिंबा दिला त्यामुळे सत्तेच मार्ग मोकळा झाला.

राजस्थानमध्ये आधीपासूनच अशोक गहलोत यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं होतं. परंतु, इथं सचिन पायलट नाराज झाले होते. सचिन पायलट यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे.

गुरुवारी पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी दिल्ली भेटीसाठी बोलावलं. दोन दिवस चर्चेनंतर अखेर आज अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांना नेतृत्त्व बहाल केलं.

======================================

First published: December 14, 2018, 3:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading