‘कुत्रा तुम्हाला चावला तर तुम्ही कुत्र्याला चावयचं’; डॉक्टरांचा सल्ला

Dog Bite : कुत्रा चावलेल्या रूग्णावर उपचार करण्याऐवजी डॉक्टरानं दिलेल्या सल्ल्यावरून राजस्थान सरकारनं आता चौकशीचे आदेश दिले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 01:21 PM IST

‘कुत्रा तुम्हाला चावला तर तुम्ही कुत्र्याला चावयचं’; डॉक्टरांचा सल्ला

जयपूर, 27 जून : कुत्रा तुम्हाला चावला तर तुम्ही कुत्र्याला चावयचं असं उत्तर तुम्हाला कुणी दिलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? शिवाय, असा सल्ला देणारा डॉक्टर असेल तर? रूग्णावर उपचार करणं हे डॉक्टरचं काम, पण इथं झालं उलटं. कुत्रा चावलेल्या रूग्णावर उपचार करण्याऐवजी डॉक्टरनं दिलेल्या सल्ल्यावरून टीकेची झोड उठली आहे. महत्त्वाचं म्हणजे या साऱ्या प्रकरणाची दखल ही राज्य सरकारला घ्यावी लागली. राजस्थानमधील अजमेर येथील एका रूग्णाला आलेला अनुभव हा चक्रावून सोडणारा आहे.

एका महिलेला कुत्रा चावला. म्हणून ही महिला उपचारासाठी डॉक्टरकडे गेली. पण, इथं डॉक्टरनं उपचार करण्याऐवजी महिलेला ‘कुत्रा तुम्हाला चावला तर तुम्ही कुत्र्याला चावयचं’ असा सल्ला दिला. या घटनेनंतर डॉक्टरवर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देखील राज्य सरकारनं दिले आहेत. मुख्य बाब म्हणजे अजमेर हा राजस्थानचे आरोग्य मंत्री रघु शर्मा यांचा जिल्हा आहे.

डॉक्टरवर टीकेची झोड

दरम्यान, या प्रकरणानंतर डॉक्टरवर देखील टीकेची झोड उडताना दिसत आहे. राज्य सरकारनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असले तरी आता रिपोर्टकडे मात्र सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

VIDEO: विरोधकांच्या आरोपांना चंद्रकांत पाटील यांचं उत्तर

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: dog
First Published: Jun 27, 2019 01:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...