काय म्हणताय! चक्क बकरा देतो दूध; हे कसं शक्य आहे?

काय म्हणताय! चक्क बकरा देतो दूध; हे कसं शक्य आहे?

आपण चुकूनही बकरीऐवजी बकरा दूध देतो असं म्हणत नाही. मात्र खरंच बकरा दूध (male goat milk) देऊ लागला आहे.

  • Share this:

राकेश सिंघाल/जयपूर, 29 जुलै : आपण कोणकोणत्या प्राण्याचं दूध (milk) पितो, असं विचारल्यावर गाय, म्हैस, बकरी असंच आपल्या तोंडात येतं. बकरीऐवजी कधी बकरा (male goat) असं आपण आजवर म्हटलं तरी आहे का? अगदी लहान मूलही चुकून बकरा दूध देतो असं म्हणत नाही. मात्र आता खरंच तसं म्हणावं लागतं आहे. कारण राजस्थानमध्ये (rajasthan) असा बकरा आहे जो दूध देतो. काय ऐकून आश्चर्य वाटलं ना तुम्हाला.

ढोलपूरमधील गुर्जा गावातील हा बकरा कुतूहलाचा विषय आहे. कारण तो दूध देतो. त्याच्यामध्ये मादी आणि नर अशा दोघांचे गुण आहेत. बरं हा बकरा कधीतरी नाही तर दररोज दूध देतो हे वाचून तर आणखीनच आश्चर्य वाटेल.

बकऱ्याचा मालक राजवीर कुशवाह यांनी सांगितलं, त्यांनी एक वर्षापूर्वी या बकऱ्याला पशू बाजारातून खरेदी केलं होतं. त्यावेळी हा बकरा दोन महिन्यांचा होता. त्यांनी तीन हजार रुपयांना खरेदी केला होता. मात्र सहा महिन्यांपूर्वीच बकऱ्यामध्ये बकरीसारखे हार्मोन्स विकसित झाले आणि तो दूध देऊ लागला. हा बकरा दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला एक लीटर दूध देतो, असा दावा त्याच्या मालकाने केला आहे.

हे वाचा - मास्क लावला नाही म्हणून पोलिसांनी चक्क बकरीला केली अटक? वाचा काय आहे प्रकरण

बकरा दूध देतो म्हटल्यावर मोठ्या संख्येने लोक त्याला पाहण्यासाठी पोहोचले. सर्वांना याचं आश्चर्य वाटलं. ललोक याला चमत्कार म्हणू लागले. डॉक्टरांनाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं मात्र हार्मोन्समधील गडबडीमुळे असं होऊ शकतं, असं डॉक्टरांनी सांगितलं.

पशूतज्ज्ञ ज्ञानप्रकाश सक्सेना म्हणाले, एक दशलक्ष प्रकरणांपैकी असं एक प्रकरण असतं. बकऱ्यामध्ये हार्मोन्समध्ये बदलामुळे असं होतं.

हे वाचा - खड्ड्यात अडकला 7 वर्षांचा मुलगा, जमिनीतून बाहेर आला फक्त एक हात! पाहा VIDEO

दूध देणाऱ्या या अनोख्या बकऱ्याला पाहण्यासाठी झुंंबड उडते. दूरदूरहून लोक त्याला पाहण्यासाठी येतात. हा बकरा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. त्यानंतर त्याच्या मालकाने बकऱ्याला विकण्यास नकार दिला आहे.

Published by: Priya Lad
First published: July 29, 2020, 5:37 PM IST

ताज्या बातम्या