जयपूर, 12 मे : राजस्थानमधीळ टोंक जिल्ह्यात नगरफोर्ट ठाण्याच्या हद्दीत बेपत्ता तरुणा आणि अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. दोघांचे मृतदेह गावाबाहेरील विहिरीत एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेत होते. सोमवारी सांयकाळपासून दोघे बेपत्ता होते. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांकडे सोपवले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तरुण दिलबाग गुर्जर आणि अल्पवयीन तरुणी सोमवारी सांयकाळी बेपत्ता झाले होते. त्यानंतर मंगळवारी दोघांचे मृतदेह गावाबाहेरील विहिरीत आढळले. याची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. तरुण आणि अल्पवयीन तरुणीचे पाय एकत्र बांधलेल्या अवस्थेत होते.
पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. नगरफोर्टमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह नेण्यात आले. तिथं महिला डॉक्टर नसल्यानं पुन्हा ते ट्रामा रुग्णालयात नेले. तिथं शवविच्छेदन करण्यात आलं.
हे वाचा : धक्कादायक! स्मशानभूमीत तब्बल 24 तास कोरोना रुग्णाचा मृतदेह अंत्यसंस्काराविना
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलिस सध्या सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तरुण दिलबाग गुर्जर हा बीटेकच्या अंतिम वर्षात शिकत होता. तर अल्पवयीन मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. घटनास्थळी पत्र किंवा इतर काही माहिती मिळालेली नाही.
हे वाचा : अंगावर थुंकला होता कोरोनाग्रस्त प्रवासी, रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime