मराठी बातम्या /बातम्या /देश /

लग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, चौघांचा मृत्यू; नवरदेवासह 40 हून जास्त जण होरपळले

लग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, चौघांचा मृत्यू; नवरदेवासह 40 हून जास्त जण होरपळले

लग्नाच्या जेवणासाठी लावलेला सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. एकूण पाच सिलिंडरचा स्फोट झाल्याचे समजते. यात ३५ जण ६० टक्के भाजलेत तर ११ जण ८० ते ९० टक्के होरपळलेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

जोधपूर, 09 डिसेंबर : राजस्थानमधील जोधपूर इथं आग लागून मोठी दुर्घटना घढली आहे. लग्न सोहळ्यावेळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असून यात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर ४० पेक्षा जास्त लोक गंभीररित्या भाजले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जोधपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ३५ पेक्षा जास्त लोक हे ६० टक्के तर ११ जण ८० ते ९० टक्के भाजले आहेत.

लग्न सोहळ्यावेळी अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ झाला. तर मंडपात असलेले लोक आगीत होरपळले. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. जोधपूरमधील भूंगरा गावात ही दुर्घटना घडली असून आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे.

हेही वाचा : 'सगळ्यांना भाजपचा पराभव करायचा होता पण...', सामनाच्या अग्रलेखात मोदींचं कौतुक

जिल्हाधिकारी हिमांशु गुप्ता यांनी दिलेल्या माहितानुसार, या दुर्घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू झाला. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. काही लोक गंभीररित्या होरपळले आहेत. सिंलिंडर स्फोटमुळे घराचे छतही कोसळले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गुरुवारी लग्नसोहळा सुरू असताना लग्नाच्या मंडपात पाहुणेमंडळी होती. यावेळी लग्नाच्या जेवणासाठी लावलेला सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. एकूण पाच सिलिंडरचा स्फोट झाल्याचे समजते. यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळही झाला. जखमींमध्ये नवरदेव आणि त्याच्या वडिलांचासुद्धा समावेश आहे.

हेही वाचा : 'आई-बाबा घरी नाहीत, तू ये..'; प्रेयसीने बोलावताच तिच्याकडे गेला अन् तरुणासोबत भयानक घडलं

सिलिंडर स्फोटाच्या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही आढावा घेतला. तसंच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आदेश दिले आहेत. सर्व जखमींवर योग्य ते उपचार करण्यात यावेत असंही सांगितलं आहे. दुर्घटनेतील जखमी लोक लवकरात लवकर बरे होवोत अशी प्रार्थना मुख्यमंत्री गेहलोत यांनी केली.

First published:

Tags: Accident